कात्रज चौकात एसटीच्या चाकाखाली येऊन तरुणीचा मृत्यू; मृत तरुणी कोल्हापूरची
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 22:04 IST2024-06-15T22:02:13+5:302024-06-15T22:04:45+5:30
या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तसेच वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास सुरू आहे.

कात्रज चौकात एसटीच्या चाकाखाली येऊन तरुणीचा मृत्यू; मृत तरुणी कोल्हापूरची
कात्रज : दोन दिवसांपूर्वीच कात्रज चौकामध्ये पीएमपीएलच्या मध्ये सापडून कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कात्रज चौकामध्ये शनिवारी सव्वा आठच्या दरम्यान एसटीचा दुचाकीला धक्का लागला व चाकाखाली येऊन एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.(MH 14 BT 4856 सांगली -स्वारगेट व MH 40 Y 5945 यामधील एका बसचा धक्का लागला व दुसऱ्या बसच्या चाकाखाली आल्याने जागेवरच मृत्यू झाला.
श्वेता चंद्रकांत लीमकर वय २५ मुळ रा.कोल्हापूर असे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे... खेड शिवापुर येथील एका कंपनीत ती नोकरीला होती अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तसेच वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास सुरू आहे.