शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्या छळामुळे तरूणाचे टोकाचे पाऊल; पत्नीसह सासू, सासऱ्यांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 18:59 IST

आई-वडिलांच्या सांगण्यावरुन पत्नीने घटस्फोट, तसेच पोटगीसाठी न्यायालायत दावा दाखल केला होता

पुणे : सासरच्या छळाला कंटाळून तरुणाने गळाफास घेऊन आत्महत्या केली.  तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी,सासू, सासऱ्यांसह सातजणांविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.     तेजस तानाजी चाळेकर (वय २७, रा. बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत तेजसची आई शीला तानाजी चाळेकर (वय ४७, रा. नसरापूर, ता. भोर) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पत्नी,सासू, सासऱ्यांसह सातजणांविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  बिबवेवाडी भागात पती -पत्नी  दोन मुलांसह राहायला होते. ८ ऑगस्ट २०२० मध्ये प्रेमसंबधातून त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्यानंतर पतीच्या आई-वडिलांनी धार्मिक रीतीरिवाजानुसार दोघांचा विवाह केला. विवाहानंतर दोघामध्ये वाद होऊ लागले. कोराेना संसर्ग काळात तरुणाचा व्यवसाय बंद पडला. त्यानंतर तरुणीला घेऊन तिचे आई-वडील माहेरी आले. चार महिने माहेरी राहिल्यानंतर ती पुन्हा सासरी नांदण्यास आली. त्यानंतर पुन्हा दोघात वाद सुरू झाले. पत्नीने आई-वडिलांना घरी बोलावून घेतले. तेथे त्यांनी गोंधळ घातला. आई-वडिलांच्या सांगण्यावरुन पत्नीने घटस्फोट, तसेच पोटगीसाठी न्यायालायत दावा दाखल केला. पत्नीच्या आई-वडिलांच्या सांगण्यावरुन एका नातेवाईकाने त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. नातेवाईकांच्या त्रासामुळे तरुणाने आई-वडिलांसह घर बदलले. बिबवेवाडीतील घर सोडून ते इंदिरानगर भागात राहायला गेले. घरी कोणी नसताना तरुणाने ९ ऑगस्ट रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे मृत तरुणाच्या आई आशा चाळेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक निकुंभ तपास करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला