शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

क्रिकेट खेळताना झालेल्या वादात मध्यस्थी केल्याने महिलेला कोयत्याने मारहाण, पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 10:10 IST

भांडणात मध्यस्थी करणाऱ्या दोघांवर काेयत्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे...

पुणे : क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून तरुणाला मारहाण करणाऱ्या टोळक्याला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण केली, तसेच भांडणात मध्यस्थी करणाऱ्या दोघांवर काेयत्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी येरवडा पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. हुसेन अस्लम खान, आमिर अस्लम खान, अस्लम हैदर खान, शोएब रशीद कुरेशी, वीरेन वाघेला, स्टीफन जाॅन्सन शिरसाठ (सर्व रा. येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत ५१ वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी (दि. ३०) सायंकाळी सहाच्या सुमारास येरवड्यातील मनोरुग्णालयासमोरील मैदानात ही घटना घडली.

किक्रेट खेळताना आरोपींचा विल्सन मरिअन याच्याशी वाद झाला. वादातून त्यांनी विल्सनला मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी तक्रारदार महिला, तिची छोटी बहीण, तसेच हरीश बबन काळे, यशवंत बबन काळे भांडणे सोडविण्यासाठी गेले. तेव्हा आरोपी आमिर खान याने घरातून कोयता आणि कुकरी आणली. आरोपींनी हरीश काळे यांना कोयत्याच्या दांड्याने मारहाण केली.

यशवंत काळे यांच्या खांद्यावर कोयत्याचा दांडा मारला. आरोपींनी तक्रारदार महिलेच्या छोट्या बहिणीशी अश्लील कृत्य केले. त्यावेळी महिलेच्या दोन मुली तेथे आल्या. त्यांनाही आरोपींनी मारहाण केली. पोलिसांकडे तक्रार दिल्यास जिवे मारू, अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींना अटक करण्यात आली असून, सहायक पोलिस निरीक्षक तुषार दोडमिसे तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड