शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

बारामती वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 19:37 IST

गतिरोधकाचा अंदाज आल्याने डीव्हायडरला दुचाकीची धडक

बारामती-बारामतीत रस्त्याच्या अपघातांत बळी जाणाऱ्या दुचाकीस्वारांंची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.शनिवारी(दि ३० )रात्री झालेल्या अपघातात आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचा अपघाती मृत्यू झाला आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी आणि वाहनांचा वेग रोखण्यासाठी तयार केलेले गतीरोधक या विद्यार्थीनीच्या अपघाताला कारणीभूत ठरले आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत्यु झालेल्या विद्यार्थीनीचे शरयू संजय मोरे (वय २२ ) असे नाव आहे. रात्री दहाच्या सुमारास बारामती शहरातील भिगवन रस्त्यावर गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. शरयू ही वैद्यकीय पदवीच्या तिसऱ्या वर्षांमध्ये शिकत होती.

तिचे वडील सांगली जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम करतात.शरयु हि हुशार विद्यार्थीनी होती.तसेच ती राष्ट्रीय खेळाडु देखील होती.एक वर्षाने ती वैद्यकीय शिक्षण पुर्ण करुन डॉक्टर म्हणून बाहेर पडणार होती. मात्र त्यापुर्वीच तिच्यावर काळाने घाला घातला.तिच्या अपघाती मृत्युने वैद्यकीय महाविद्यालयावर शोककळा पसरली आहे.

शरयू मोरे ही तिच्या एका मैत्रिणीसह दुचाकीवरून शनिवारी रात्री बारामतीतून एमआयडीसी परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वस्तीगृहाकडे निघाली होती. भिगवन रस्त्यावरील ऊर्जा भवन नजीक तिची दुचाकी आली असता, ऊर्जा भवन नजीकचा गतिरोधकाचा अंदाज तिला आला नाही आणि तिची दुचाकी डिव्हायडरला धडकली. यात दुचाकी चालवणाऱ्या शरयूचा जागीच मृत्यू झाला तर तिची दुसरी मैत्रीण जखमी झाली आहे.तिच्यावर उपचार सुरु आहेत.

शनिवारी(दि ३०) सकाळी पावणेसातच्या सुमारास बारामती निरा मार्गावर शारदानगर येथे एसटी बस आणि दुचाकीचा अपघात झाला.या अपघातात दुचाकीवर आपल्या नातीला शाळेत सोडण्यासाठी आलेले ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र दिनकर भागवत (वय ५९,रा.गोखळी,ता.फलटण,जि.सातारा)यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्यांची नात आणि प्रसिध्द खेळाडु स्वरा योगेश भागवत हि गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर बारामतीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.याशिवाय शनिवारी रात्री झालेल्या अपघातात वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्या विद्यार्थीनीचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे शनिवार हा घातवार ठरला.

टॅग्स :BaramatiबारामतीAccidentअपघात