शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कार नादुरुस्त असूनही जिद्दीने मिळवले यश; प्रथम क्रमांक पटकावून पुण्याची निकिता ठरली 'Fastest Driver'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 10:20 IST

निकितीचा जागतिक स्तरावरील मोटर रॅलीमध्ये (डब्ल्यू.आर. सी.) मध्ये सहभागी होऊन भारताचे नाव जगाच्या नकाशात कोरण्याचा संकल्प

हडपसर : इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशिप  2022 वेस्ट झोन क्वालिफाईड राऊंड पुणे नानोली येथे पार पडला. या रॅलीमध्ये फास्टर ड्रायव्हर सह चार ट्रॉफी मिळविण्यात पुण्याच्या निकिता टकले - खडसरेला यश आले आहे. कार नादुरुस्त होऊनही जिद्दीने स्पर्धेत यश मिळविल्याने निकिताचे अभिनंदन होत आहे. 

 26 व 27 नोव्हेंबर रोजी पुण्यातील नानोली गावामध्ये दोन दिवसीय इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये भारताच्या वेस्ट झोन व बेंगलोर, हैदराबादसह 50 ते 60 कार रायडर सहभागी झाले होते. स्पर्धेत नवख्या निकिता टकले खडसरेने पहिल्याच दिवशी फास्टर ड्रायव्हर या गटात पहिली ट्रॉफी पटकावली. या ट्रॉफीसह विविध राउंड मध्ये आणखी तीन ट्रॉफी मिळविल्याने तिचे कौतुक होत आहे. एफएमएससीआय च्या आयोजकांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरीत करण्यात आली.

दुसरा दिवस मात्र निकितासाठी खूप खडतर होता. कारण पहिल्या दिवशीच्या राऊंडनंतर गाडी बंद पडल्याने व स्पर्धा खेडेगावात असल्याने त्या ठिकाणी गाडीचे पार्ट व मेकॅनिक उपलब्ध न झाल्याने स्पर्धेत पुन्हा सहभागी होण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु नाउमेद न होता इतर गाड्यांचे पार्ट टाकून कार सुरू केली. परंतु गाडी दुरुस्त झाली नाही तरी. पुन्हा सहभागी होत निकिताने एक ट्रॉफी पटकावली. पहिल्या दिवशी फास्टर ड्रायव्हरसह तीन ट्रॉफी पटकविल्या. निकिताच्या या यशाचे श्रेय ती वडील उद्योजक नितीन टकले, पती शुभम खडसरे, कुटुंबीय व तिचे मार्गदर्शक चेतन शिवराम यांना देते. ''दोन ते पाच डिसेंबर रोजी इंडियन नॅशनल चॅम्पियनशिप (के 1000) आयोजित केली आहे. यामध्ये निकिता टकले सहभागी होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन पहिली ट्रॉफी जिंकण्याचा मानस तिने बोलताना व्यक्त केला. राष्ट्रीय स्तरावर सहभागी होत यश मिळवीत असताना मुख्य लक्ष जागतिक स्तरावरील मोटर रॅलीमध्ये (डब्ल्यू.आर. सी.) मध्ये सहभागी होऊन भारताचे नाव जगाच्या नकाशात कोरण्याचा संकल्प निकिता टकलेने प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.''

टॅग्स :PuneपुणेcarकारWomenमहिलाIndiaभारतSocialसामाजिक