"आम्ही कोणाला कॉल करणार नाही. काय नशिबात लिहिले आहे, ते बघू. मला फक्त वाईट वाटत आहे की, महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल आहे', असे विधान नवनिर्वाचित खासदार पार्थ पवार यांनी केले. त्यांच्या या विधानानंतर संतापलेल्या काँग्रेसने थेट कुटुंबीयांच्या पुर्व पुण्याईवर खासदार झाले म्हणत सुनावले. धड भाषण न देता येणाऱ्याने असं बोलणं म्हणजे जरा जास्तच आहे, असा खोचक टोलाही काँग्रेसने लगावला.
खासदार पार्थ पवार यांनी केलेल्या विधानाला उत्तर देताना महाराष्ट्र काँग्रेसने म्हटले आहे की, "धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने कॉंग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झाले?"
चौकशीतून बचावासाठी सरेंडर झालेला कृतघ्न मुलगा
"स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील", असा पलटवार काँग्रेसने पार्थ पवारांवर केला.
"या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यात एफआरआय नोंद करून घेतला. तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे?", अशी टीका काँग्रेसने पार्थ पवारांवर केली आहे.
Web Summary : Congress criticized Parth Pawar's remarks about Congress's downfall. They questioned his political achievements, citing family privilege and inability to deliver speeches. Congress accused him of ingratitude and silence after his father's death.
Web Summary : कांग्रेस ने पार्थ पवार की कांग्रेस के पतन पर टिप्पणी की आलोचना की। उन्होंने उनके राजनीतिक उपलब्धियों पर सवाल उठाया, पारिवारिक विशेषाधिकार और भाषण देने में असमर्थता का हवाला दिया। कांग्रेस ने उन पर कृतघ्नता और अपने पिता की मृत्यु के बाद चुप्पी साधने का आरोप लगाया।