शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

Vadgaon Sheri Vidhan Sabha Election Result 2024 Live: पुण्यात आघाडीचा एकच गढी; वडगाव शेरीत शरद पवार गटाचे बापू पठारे विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 14:24 IST

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live Updates: अजित पवार गटाच्या सुनील टिंगरेंचा पराभव करत पठारे यांनी पुण्यात महाविकास आघाडीला एक जागा मिळवून दिली

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live Updates : पुण्याच्या वडगाव शेरी मतदार संघातून शरद पवार गटाचे बापू पठारे विजयी झाली आहेत. अजित पवार गटाच्या सुनील टिंगरेंचा पराभव करत पुण्यात महाविकास आघाडीला एक जागा मिळवून दिली आहे. बापू पठारे अवघ्या 5000 मतांनी विजयी झाले आहेत. चौदाव्या फेरीपासून बापू पठारे यांनी आघाडी घेतली होती. ती अखेरपर्यंत टिकवून ठेवत पठारे यांनी विजय मिळवला आहे. 

 पुण्याच्या वडगाव शेरीत अखेरच्या क्षणापर्यंत महायुतीच्या उमेदवारीबाबत रस्सीखेच सुरु होती. मुळीक यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तेच पराभवाचं कारण असल्याची शक्यता आहे. तसेच टिंगरे यांच्याबाबत पोर्शे अपघात प्रकरण नडले का? याबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. माजी आमदार बापू पठारे यांनी भाजपमधून शरद पवार गटात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. आता रिंगणार टिंगरे व पठारे असे दोन आजी-माजी आमदार हेच प्रमुख उमेदवार होते. त्यांच्यात लढत झाली. टिंगरे यांना पोर्शे कार अपघात प्रकरण नडणार की त्यांनी केलेली विकासकामे त्यांना तारणार?, पठारे यांनी आमदार असताना मतदारसंघात केलेली कामे त्यांना विजय मिळवून देतील की ऐनवेळी पक्षांतर करणे त्यांना त्रासदायक ठरेल यावरून विजय ठरणार होता. अखेर बापू पठारे विजयी झाले आहेत. 

इथं क्लिक करा >>महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ 

पठारे यांना विजयाचा विश्वास 

कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या जोरावर मी ही निवडणूक जिंकणार आहे. आमच्या विरोधात उमेदवार कोण आहे त्याची आम्हाला काही देणे घेणे नाही. फक्त विकास हा मुद्दा घेऊनच आम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत. आणि विकासाचा हाच मुद्दा आम्हाला निवडणूक जिंकून देणार आहेत. मुळात ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली आहे. जनतेनीच ठरवले की त्यांना बापूसाहेब पठारे आमदार हवाय असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.  टिंगरे २०१९  चे विजयी उमेदवार 

वडगाव शेरी मतदार संघातून सुनील टिंगरे २०१९ साली निवडून आले होते. त्याठिकाणी बापू पठारे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार आहेत. बापू पठारे २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ३० ते ४० हजारांच्या फरकाने निवडून आले होते. तर २०१४ ला तिसऱ्या नंबरवर राहून पराभूत झाले होते. २०१९  मात्र त्यांनी निवडणूक लढवली नाही. तेव्हा टिंगरे राष्ट्रवादीकडून विजयी झाले होते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024sunil tingreसुनील टिंगरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीvadgaon-sheri-acवडगाव शेरी