शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

‘इथे मराठी माणसं राहत होती’अशी पाटी लावावी लागेल;हिंदीच्या सक्तीविरोधात मनसेचा हल्लाबोल

By राजू इनामदार | Updated: April 18, 2025 20:22 IST

हिंदी ही संपर्कसुत्र म्हणून देशाची भाषा आहे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मताचाही निषेध करण्यात आला.

पुणे : शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने संबंधित अध्यादेश जाळून निषेध व्यक्त केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही सक्ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिल्यानंतर हे आंदोलन करण्यात आले.

झाशीची राणी चौकात या अध्यादेशाची होळी करण्यात आली. हा शासन निर्णय म्हणजे मराठीचे खच्चीकरण करून मराठी भाषेचे अस्तित्व संपविण्याचा शासनाचा घाट आहे, उद्या काही दशकानंतर ‘इथे मराठी माणसं राहत होती’, अशी पाटी लावावी लागेल. मराठी अस्ताची सुरुवात या मराठी द्रोही सरकारी निर्णयानुसार होईल, अशी टीका करण्यात आली. हिंदी ही संपर्कसुत्र म्हणून देशाची भाषा आहे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मताचाही निषेध करण्यात आला.मनविसेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांनी सांगितले की, इतक्या लहान वयात विद्यार्थ्यांवर तीन तीन भाषांची सक्ती करण्याआधी सरकारने तज्ज्ञांचा विचार घ्यायला हवा होता. तसे न करता केंद्र सरकार ही बळजबरी करत आहे व राज्य सरकार त्याला मान्यता देत आहे. हिंमत असेल तर राज्य सरकारने केंद्र सरकारला, इथे हे चालणार नाही, असे खडसावून सांगावे. आंदोलनाची दखल घेतली नाही तर पुण्यात हिंदी भाषेचे एकही शालेय पुस्तक आणू दिले जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. प्रशांत कनोजिया, ॲड. सचिन पवार, नरेंद्र तांबोळी, सुनील कदम, अभिषेक भाई थिटे, रुपेश घोलप, सारंग सराफ, विक्रांत भिलारे, परिक्षित शिरोळे, ॲड. सचिन ननावरे, केतन डोंगरे, नीलेश जोरी, आशुतोष माने, अशोक पवार, शशांक अमराळे, हेमंत बोळगे, संतोष वरे आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMNSमनसेhindiहिंदीmarathiमराठी