शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील धक्कादायक घटना! वडिलांसह शाळेत निघालेल्या चिमुकलीला कंटेनरने चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 14:54 IST

घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु

हडपसर : हडपसर सासवड रोड सातववाडी येथे मुलीला शाळेत घेऊन जात असताना दुचाकी घसरून मुलगी व वडील दोघेही टँकर खाली आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत बाप लेकीचा मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यावर मुलगी गंभीर जखमी असताना नागरिकांनी तात्काळ तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तो पर्यंत तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही घटना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली, मुलीला शाळेत सोडत असताना बाप लेकीचा मृत्यू झाल्याची घटना क्षणभरात हडपसर परिसरात पसरली. घटनास्थळी हडपसर पोलीस व जीव रक्षक फाउंडेशनचे कार्यकर्त्यांनी मदत कार्य केले.

मीनाक्षी निलेश  साळुंखे ( वय १० ), निलेश साळुंखे ( वय ३५ रा. ढमाळवाडी फुरसुंगी ) असे अपघातात मृत्यु झालेल्या बाप - लेकीचे नावं आहे. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितल्यानुसार, निखिल साळुंखे यांची मुलगी मीनाक्षी ही साधना शाळेमध्ये इयत्ता पाचवी वर्गामध्ये शिकत होती.

सकाळी सात वाजता शाळेला सोडायला वडील दुचाकीवरून जात असताना, सातववाडी येथे अपघात झाला. सातववाडी येथे सायकल ट्रॅक शेजारी कचरा कुंडी आहे. या कचरा कुंडी शेजारून पुढे जाणाऱ्या दुचाकीस्वाराने दुचाकी चालू अवस्थेत हातातील कचऱ्याची पिशवी कचराकुंडीत फेकली. त्यावेळी मागून येणारे निखिल साळुंखे गडबडले आणि चिखलावरून त्यांची दुचाकी घसरली. यामध्ये दोघेही बापलेकी पाठवून पाठीमागून येणाऱ्या टँकर खाली गेले. यामध्ये टँकरचे चाक वडिलांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागेचा मृत्यू झाला. तर मुलीचे डोके रस्त्यावर आपटल्याने ती गंभीर जखमी झाली होती. तिने वडिलांना पाहिले तेव्हा ती बाबा बाबा म्हणून ओरडली. तिला वाचवण्यासाठी नागरिकांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बापलेकीचा मृत्यू झाल्याची घटना क्षणात हडपसर परिसरामध्ये पसरली. घटना स्थळी हडपसर पोलिसांनी धाव घेऊन घटनेची माहिती जात आहे घेतली.

टॅग्स :HadapsarहडपसरAccidentअपघातDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलPoliceपोलिस