पुणे: दुचाकीस्वार जेष्ठ नागरिकाला मांजा कापून गालाला आणि अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. ही घटना मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवाजी पुलावर घडली. देवराम दत्तात्रय कामठे लवय ६७ राहणार पुरंदर, सध्या शिवाजीनगर ) असे जखमी झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे.
दुचाकीस्वार कामठे हे मंगळवारी (दि. १४) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर गावठाणातून शनिवार वाड्याच्या दिशेने जात होते. त्याचवेळी अचानकपणे त्यांच्या समोर मांजा आला. गाडीवर असतानाही त्यांनी प्रसंगावधान दाखवत हाताने मांज्याला दूर केले. मात्र, मांजाचा फास त्यांच्या अंगठ्याला आणि गालाला बसला. त्यामुळे ते जखमी झाले. दरम्यान, शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हे शाखेकडून वारंवार कारवाई करूनही माझ्या विक्रेत्यांसह डीलरही बेशिस्तपणे मांजाची विक्री करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांसह पशु जखमी होत असल्याच्या दुर्घटना घडत आहेत.