शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Video: पुण्यात कॅनॉलमध्ये रिक्षा पडली; चालक वाहून गेल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 11:19 IST

जनता वसाहतीतील कॅनॉलवरील रोडवर रिक्षा वळवत असताना नियंत्रण सुटल्याने एक रिक्षा थेट कॅनॉलमध्ये पडली

पुणे : जनता वसाहतीतील कॅनॉलवरील रोडवर रिक्षा वळवत असताना नियंत्रण सुटल्याने एक रिक्षा थेट कॅनॉलमध्ये पडली. अग्निशामक दलाच्या जवानांना एक तासाच्या प्रयत्नानंतर कॅनॉलमधून रिक्षा बाहेर काढण्यात यश मिळाले. परंतु, रिक्षाचालकाचा शोध लागू शकला नाही. कॅनॉलमधील पाण्याला वेग असल्याने तो वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास जनता वसाहत येथील कॅनॉलवरील रोडवर एक रिक्षाचालक रिक्षा वळवत होता. मात्र, त्याचा अंदाज चुकल्याने रिक्षा कॅनॉलमध्ये पडली. जवळच अग्निशमन केंद्र असल्याने बंब व रेक्यू व्हॅन तातडीने तेथे पोहोचले. मात्र, अंधारामुळे रिक्षाचा शोध घेण्यास उशीर लागला. एक तासाच्या प्रयत्नांनंतर रात्री ९ वाजता रिक्षा बाहेर काढण्यास अग्निशामक दलाला यश आले. मात्र, रिक्षामध्ये चालक नव्हता. त्याचा शोध लागू शकला नाही. पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो वाहून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते.

टॅग्स :Puneपुणेauto rickshawऑटो रिक्षाfire brigade puneपुणे अग्निशामक दलPoliceपोलिस