शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

Pune: मदनवाडीला आढळला महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 10:30 IST

पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय भिगवण येथे नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले...

भिगवण (पुणे) : मदनवाडी ग्रामपंचायत हद्दीत एका ४० वर्षीय महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली. मंगळवारी (ता. ०६) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

वैशाली कल्याण काळे (वय ४०, रा. मदनवाडीची भकासवाडी, ता. इंदापूर) असे मृतदेह आढळून आलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मयत महिलेची बहीण शालन प्रताप काळे (रा. मदनवाडीची भकासवाडी, ता. इंदापूर) यांनी भिगवण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ०५) संध्याकाळच्या सुमारास वैशाली काळे ही जेवण घेऊन येते, असे म्हणून घराबाहेर गेली होती. ती रात्री खूप उशीर झाला तरीही परत आली नाही. मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तिचा शोध घेतला असता मदनवाडी गावच्या हद्दीत व्यंकटेश लॉन्ससमोरील वीटभट्टीच्या बाजूला शरीर अर्धवट जळालेल्या अवस्थेत वैशाली आढळून आल्या. पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय भिगवण येथे नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. हा घातपात आहे की इतर काही याबाबतचा तपास भिगवण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विनायक द्डस पाटील हे करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी