शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

नवजात अर्भकाला फेकले हॉस्पिटलच्या खिडकीतून; १९ वर्षीय तरुणीचे धक्कादायक कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 10:16 IST

अविवाहित तरुणीने टॉयलेटमध्ये जाऊन एका मुलीला जन्म देऊन खिडकीतून बाहेर फेकले

पुणे: सिंहगड रोडवरील नवले हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या एका अविवाहित तरुणीने टॉयलेटमध्ये जाऊन एका मुलीला जन्म दिला. धक्कादायक बाब म्हणजे तिने त्या नवजात अर्भकाला बाथरूमच्या खिडकीतून बाहेर फेकून दिले. त्यात त्या अर्भकाचा मृत्यू झाला.

हा प्रकार नऱ्हे येथील एका हॉस्पिटलमध्ये शनिवारी सकाळी साडेदहा वाजता घडला. याप्रकरणी नंदा ढवळे (वय ६२, रा. बाणेर) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका १९ वर्षाच्या तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी १९ वर्षीय तरुणी मानाजीनगर येथील हॉॅस्टेलमध्ये राहते. ती ८ महिन्यांची गर्भवती होती. तिने ही बाब सर्वांपासून लपवून ठेवली होती. पोटात दुखू लागल्याने ती जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये आली. पाठीचे दुखणे व अशक्तपणाची तक्रार तिने केली. त्यानंतर ती हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टी वॉर्ड शेजारील पेशंटच्या टॉयलेटमध्ये गेली. तेथे तिने एका मुलीला जन्म दिला. त्या नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला तिने टॉयलेटच्या खिडकीतून बाहेर फेकून दिले. त्यामुळे या अर्भकाचा मृत्यू झाला. या तरुणीवर गुन्हा दाखल केला असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे़ पोलिस उपनिरीक्षक लाड तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाPregnancyप्रेग्नंसीhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य