शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या विरोधात मनी लॉन्डरिंगची केस; भीती दाखवून नऊ लाखांचा गंडा

By भाग्यश्री गिलडा | Updated: April 28, 2024 15:53 IST

परदेशात पाठवलेल्या कुरिअरमध्ये अंमली पदार्थ सापडल्याचे सांगून पोलिसी कारवाईची भिती दाखवून फसवणूक केल्याचे समोर

पुणे : तुमच्या विरोधात मनी लॉन्डरिंगची केस आहे तुम्हाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात यावे लागेल अशी भीती दाखवून तरुणाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. तुमचे नावाने परदेशात पाठवलेल्या कुरिअरमध्ये अंमली पदार्थ सापडल्याचे सांगून पोलिसी कारवाईची भिती दाखवून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याबाबत शनिवारी (दि. २७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत हडपसर येथील मयंक ठाकूर (१९) याने यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक माहितीनुसार हा प्रकार १ मार्च २०२४ रोजी घडला आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाईलवर सायबर चोरट्यांनी फोन केला. तुमच्या नावाने एक पार्सल पाठविण्यात आले आहे. तुमचे नाव मनी लॉन्डरिंगमध्ये असल्याने पार्सल कस्टम विभागाकडे अडकले आहे. तसेच त्यात अवैध अंमली पदार्थ सापडले आहे. तुमच्या नावाचा गैरवापर केला जात असून त्यासाठी तुमचे आधारकार्ड व बँक खात्याचा वापर करून मनी लॉन्डरिंग करण्यात आली आहे असे सांगून एक लिंक पाठवत तरुणाचा विश्वास संपादन केला. त्यांनतर पोलीस अधिकारी बोलत असल्याचे सांगून चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर व्हावे लागेल असे सांगून अटकेची भीती दाखवली. तुमच्या बँक खात्याची पडताळणी करायची असून तातडीने खासगी बँकेतील रोकड सरकारी बँकेत जमा करावी लागेल, असे सांगत तरुणाला ९ लाख १६ हजार रुपये चोरट्यांनी सांगितलेल्या खात्यावर ट्रान्सफर करायला सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मोढवे करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसMONEYपैसाfraudधोकेबाजी