शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलमध्ये हरवलेल्या चिमुकल्यांना पुस्तक वाचण्याचा संदेश; बाप्पाच्या चरणी पुस्तकांचा महानैवद्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 14:56 IST

पुस्तक वाचनाने माणूस समृद्ध होतो, त्यामुळे पुस्तके वाचली पाहिजेत

पुणे: पुस्तक वाचनाने माणसू समृध्द होतो. त्यामुळे पुस्तके वाचली पाहिजेत. हाच संदेश देण्यासाठी जय गणेश व्यासपीठ पुणे शहर यांच्या वतीने बाप्पासाठी पुस्तकांचा नैवैद्य दिला. पुण्यातील विविध गणेश मंडळे आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रथम प्रस्थापित गणपती विंचूरकर वाडा येथे बाप्पांच्या चरणी पुस्तके अर्पण केली.

बाल साहित्यिका डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते यावेळी पूजन करण्यात आले.  शिरीष मोहिते, पियुष शहा, अमर लांडे, सचिन पवार, सुधीर ढमाले, किरण सोनीवाल, भाऊ थोरात, हरीश खंडेलवाल, राकेश चव्हाण, कुणाल पवार, रवींद्र पठारे यावेळी उपस्थित होते. साईनाथ मंडळ - बुधवार पेठ, सेवा मित्र मंडळ, नवज्योत मित्र मंडळ ट्रस्ट - येरवडा, शनि मारुती बाल गणेश मंडळ - एरंडवणा, एकता मित्र मंडळ - अरणेश्वर, वीर शिवराज मंडळ - गुरुवार पेठ, श्री शिवाजी मंडळ - भवानी पेठ, अखिल कापडगंज मित्र मंडळ, अखिल रामनगर मंडळ येरवडा, पोटसुळ्या मारुती मंडळ या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपक्रमात सहभाग घेतला.

संगीता बर्वे म्हणाल्या, विद्येच्या देवतेला पुस्तकाचा नैवैद्य ही चांगली संकल्पना आहे. गणेश मंडळांचा यामधील सहभागी मोठी गोष्ट आहे. मुले मोबाईल मध्ये हरवली आहेत, त्यांचे पुस्तकांशी नाते कमी झाले आहे. वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या रंगांची पुस्तके पाहिल्यावर मुले मोबाईल बाजूला ठेवून पुस्तक हातात घेतील. यासाठी पालकांनी ग्रंथालयांनी मदत करायला पाहिजे. मुलांना पुस्तके वाचून दाखवली पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

शिरीष मोहिते म्हणाले, गणेशोत्सव विचारांच्या व ज्ञानाच्या वृद्धीसाठी साजरा करण्याचा प्रयत्न गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यासाठी विविध प्रकारची पुस्तके मुलांसाठी गोळा करण्यात आली आहेत. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी बुध्दीची देवता गणेशाला हा पुस्तकांचा नैवैद्य अर्पण करण्यात आला. शहरातील गरजू आणि ग्रामीण भागातील मुलांना ही पुस्तके देण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीEducationशिक्षणSocialसामाजिक