शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

बारामती| भरदिवसा घरे फोडणाऱ्या अट्टल घरफोडी करणाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 20:15 IST

पोलिसांनी ताबा वॉरंटच्या आधारे त्याला ताब्यात घेत अटक केली...

बारामती (पुणे): भरदिवसा बंद घरे हेरुन घरे फोडणाऱ्या अट्टल घरफोड्याला बारामती पोलिसांनी अटक केली. लोकेश रावसाहेब सुतार (वय २८, रा. लिंगनूर, ता. मिरज, जि. सांगली) असे या घरफोड्याचे नाव आहे. सध्या तो कोल्हापूरमध्ये न्यायालयीन कोठडीत होता. पोलिसांनी ताबा वॉरंटच्या आधारे त्याला ताब्यात घेत अटक केली.

शहरात घडलेल्या गुन्ह्याच्या पद्धतींचा तपास करण्यात आला. त्यानुसार शेजारील जिल्ह्यात माहिती घेतली असता लोकेश सुतार हा कळंबा कारागृहातील आरोपीने अशा पद्धतीचे गुन्हे केल्याचे दिसून आले. पोलिसांनी वॉरंटच्या आधारे त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे तपास केला असता त्याने साथीदार  पाटील याच्या मदतीने बारामतीत भर दिवसा घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सात लाख २० हजार रुपये किमतीचे सुमारे १८ तोळे सोन्याचे दागिने गुन्हे प्रकटीकरण शाखेने  हस्तगत केले आहेत.संदीप यशवंत पाटील (रा. लिंगनूर) या साथीदाराच्या मदतीने तो घरफोड्या करत होता. त्याच्याकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे. 

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहरामध्ये बंद घरे फोडून लूट करण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी गुन्हे उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, सपोनि प्रकाश वाघमारे, उपनिरीक्षक सागर ढाकणे, अंमलदार अभिजित कांबळे, संजय जाधव, संजय जगदाळे, रामचंद्र शिंदे, कल्याण खांडेकर, दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण, बंडू कोठे, अंकुश दळवी, रणजित देवकर, दशरथ इंगोले, अजित राऊत आदींचे तपास पथक तयार करण्यात आले होते.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड