शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

थोडी भीती..., थोडा आनंद..., अन् उत्सुकता; अवघ्या काही तासातच बारावीचा निकाल जाहीर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 10:59 IST

विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी २ वाजता निकाल पाहता येणार

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.२५) दुपारी दाेन वाजल्यापासून ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व काेकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( १२ वी ) परीक्षा घेण्यात आल्या हाेत्या. राज्यातील ३ हजार १९५ परीक्षा केंद्रांवर सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. परीक्षेचा निकाल दुपारी २ वाजता जाहीर केल्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांना १. mahresult.nic.in २. https://hse.mahresults.org.in/ ३.http://hscresult.mkcl.org. या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.

परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येतील आणि त्याची प्रिंटही घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती मिळणार आहे. तर कनिष्ठ महाविद्यालयांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर एकत्रित निकाल उपलब्ध करून देण्यात येईल.

गुण पडताळणीसाठी २६ मे पासून करा अर्ज

ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर बारावी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांतील गुणांची पडताळणी करता येणार आहे. उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने (http://verification.mhe hsc.ac.in) या संकेतस्थळावरून स्वत: तसेच कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची साेय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी,शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना बारावीची गुणपत्रिका व स्थलांतर प्रमाणपत्र त्यांच्या शाळा महाविद्यालयामार्फत ५ जून पासून दुपारी तीन नंतर वितरित करण्यात येतील.गुण पडताळणीसाठी २६ मे ते ५ जून आणि छायांकित प्रतीसाठी २६ ते १४ जून या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. त्यासोबतच ऑनलाइन पद्धतीने डेबिट, क्रेडिट आणि यूपीआय आणि बँकिंगद्वारे शुल्क भरता येणार आहेत.

पुनर्मूल्यांकनासाठी छायाप्रत अनिवार्य

उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यानंतर पाच दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

पुर्नपरीक्षा, श्रेणी सुधारसाठी २९ जूनपासून अर्ज

जुलै-ऑगस्ट मध्ये हाेणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुर्नपरीक्षा देणारे विद्यार्थी आणि श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी २९ मे पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेHSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थीEducationशिक्षण