शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

भोर रस्त्यावर दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक;एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:50 IST

नागरिकांच्या मदतीने आणि वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे दोघांना तातडीने भोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पुणे - कापूरव्होळ–भोर रस्त्यावर माळवाडी गावच्या हद्दीत काल (१० जून) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.अधिकच्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव शुभम राजेंद्र पवार (वय २७) असून, गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव कुणाल जालिंदर खोपडे (दोघेही रा. आळंदे, ता. भोर) असे आहे. हे दोघे दुचाकी (क्र. एम.एच. १२ पी.एक्स. ९९७९) वरून भोरकडे येत असताना, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या व्हॅगनर कारने  (क्र. एम.एच. १२ एल.जे. ०५६१)  माळवाडीच्या हद्दीत समोरासमोर जोरदार धडक दिली.दरम्यान, धडकेनंतर दोघेही रस्त्यावर फेकले गेले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या मदतीने आणि वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे दोघांना तातडीने भोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी शुभम पवार याला मृत घोषित केले. या अपघाताबाबत राजगड पोलीस अधिक तपास करत असून, कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे प्राथमिक माहितीतून समजते.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात