११ कोटींचा सोनेरी रंगाचा घोडा, एक कोटीची कंधारी गाय अन् मुऱ्हा रेडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 09:41 IST2025-01-19T09:41:23+5:302025-01-19T09:41:58+5:30

‘कृषक’ च्या प्रदर्शनात दीड फूट उंचीची बन्नूर मेंढी

A golden horse worth 11 crores, a Kandhari cow worth 1 crores and a red mule! | ११ कोटींचा सोनेरी रंगाचा घोडा, एक कोटीची कंधारी गाय अन् मुऱ्हा रेडा!

११ कोटींचा सोनेरी रंगाचा घोडा, एक कोटीची कंधारी गाय अन् मुऱ्हा रेडा!

बारामती : येथील  ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित  कृषक प्रदर्शनात सोनेरी रंगाचा घोडा, दीड फूट उंचीची बन्नूर मेंढी, १,५०० किलो वजनाचा कमांडो नावाचा रेडा, ३ फुटांची पोंगनूर गाय आकर्षण ठरले.

हैदराबादच्या  नवाब हसन बिंद्रिप यांच्या सोनेरी रंगाच्या  घोड्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. हा घोडा पाहण्यासाठी शेतकऱ्यांची आणि अश्वप्रेमींची गर्दी झाली होती.  विशेष म्हणजे, या घोड्याची मालेगावच्या यात्रेत ११ कोटींची किंमत सांगितली होती. त्यामुळे प्रदर्शनातील  हा ११ कोटी रुपये किमतीचा घोडा चर्चेत  आहे.

विशेष म्हणजे, मारवाडी पठड्याच्या हा घोडा असून, तो देशात एकमेव असल्याचा दावा नवाब यांनी केला आहे.  हा घोडा ८ वर्षांचा आहे, तो त्यांनी पुष्करच्या यात्रेतून खरेदी केला आहे. त्या घोड्याचा खुराक ऋतुमानानुसार वेगवेगळा असून, त्याचे डोळे आणि शरीर यांचा रंग एकसारखा असल्याने हा घोडा अतिशय आकर्षित करत आहे. हा घोडा पाण्यासाठी गर्दी होत होती. 

दीड टनाचा कमांडो रेडा पितो रोज तूप
पिंपरी सांडसचे अमित शिंदे यांचा १,५०० किलो वजनाचा १ कोटी रुपये किमतीचा कमांडो नावाचा रेडाही भाव खाऊन गेला. या रेड्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी गर्दी झाली होती. दररोज या रेड्याला ५० किलो चारा, सरकी, खोबरे पेंड, एक किलो  गावरान तूप आणि १० लिटर दुधाचा आहार आहे, तसेच नांदेडच्या लोहा तालुक्यातील विश्वनाथ जाधव यांची १ कोटी रुपये किमतीची रामा आणि रावण नावाची लाल कंधारी जातीचे बैल शेतकऱ्यांच्या काैतुकाचा विषय ठरली, कर्नाटकच्या बन्नूर येथील दुर्मीळ दीड फूट उंचीची बन्नूर जातीची मेंढी प्रथमच पाहावयास मिळाली. ही मेंढी चेहरा वाचणारी आहे. तिला माणसांचे भाव समजतात, असे याबाबत लिंगा राजू यांनी  सांगितले . ३ फुटी पोंगनूर गाय पालनाचा बारामतीत प्रयोग यशस्वी करणारे किशोर हिंगणे यांनी  सांगितले की, मूळ आंध्राची ही गाय आहे. 

Web Title: A golden horse worth 11 crores, a Kandhari cow worth 1 crores and a red mule!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.