शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

"मित्राच्या कुटुंबाला कोरोना झालाय; पैशांची गरज आहे", अमेरिकेतून ज्येष्ठ पुणेकराला २६ लाखांना लुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 20:27 IST

बनावट प्रोफाईल ठेवून सायबर चोरट्याने डॉलर पाठविल्याची बतावणी करून एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल २६ लाखांना गंडा घातला आहे.

पुणे : माझ्या भारतातील एका मित्राच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोना झाला असून, त्याला पैशांची गरज आहे. मी सांगतो त्या खात्यावर काही पैसे पाठव. मी तुला लगेच येथून डॉलर पाठवतो, असा व्हॉट्सॲपवर अमेरिकेत असलेल्या भावाचा फेसबुकवरील फोटो व्हॉट्सॲप प्रोफाईल असलेला मेसेज एका ज्येष्ठ नागरिकाला आला. तो खरा वाटून त्याप्रमाणे पैसे पाठविले. बनावट प्रोफाईल ठेवून सायबर चोरट्याने डॉलर पाठविल्याची बतावणी करून एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल २६ लाखांना गंडा घातला आहे.

या प्रकरणी ६८ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ज्येष्ठ नागरिक असून ते सुखवस्तू आहेत. त्यांच्या मुलाचा व्यवसाय आहे. त्यांचा भाऊ अमेरिकेत राहतो. त्यांचा तेथे कन्सल्टन्सीचा व्यवसाय आहे. १० ऑक्टोबर २०२१ रोजी सायबर चोरट्याने फिर्यादींच्या भावाचा व्हॉट्सॲप प्रोफाईल असलेल्या एका क्रमांकावरून मेसेजद्वारे संपर्क साधला. त्यांना संशय येऊ नये म्हणून चोरट्यांनी अगोदरच नेटवर्क प्रॉब्लेम असल्याचे कारण सांगितले. फिर्यादींना भाऊ बोलत असल्याचे वाटल्याने त्यांनी त्यांच्यासोबत संवाद सुरू ठेवला. भारतातील माझ्या एका मित्राच्या कुटुंबीयांना कोरोना झाला असून, त्यांना पैशांची गरज असल्याचे सांगून ५ लाख रुपये नितीन दहिया नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर भरण्यास सांगितले. फिर्यादींना भाऊ सांगतो आहे असे वाटल्यामुळे त्यांनी त्या खात्यावर पैसे भरले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी फिर्यादींना त्यांच्या व्हॉट्सॲप मेसेजवर त्यांच्या खात्यात डॉलर भरल्याचे स्क्रीनशॉट पाठवले. त्यामुळे त्यांना आणखीनच खात्री वाटली. फिर्यादी हे जाळ्यात अडकल्याचे पाहून चोरट्यांनी १३ ऑक्टोबरपर्यंत ५ ते ६ वेळा एकूण २६ लाख रुपये विविध कारणे सांगून भरून घेतले. त्या बदल्यात प्रत्येकवेळी डॉलर पाठविल्याचे स्क्रीनशॉट टाकून दोन दिवसांत पैसे जमा होतील, असे सांगितले. आरोपी पैसे मागत राहिले आणि फिर्यादी भरत गेले. एके दिवशी फिर्यादींनी बँकेत जाऊन खात्यावर डॉलर जमा झाले की नाही हे पाहिले. तेव्हा असे कोणतेच पैसे त्यांच्या खात्यावर आले नसल्याचे बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, संशय आल्यामुळे त्यांनी आपल्या भावाला फोन करून विचारणा केली. त्यावेळी त्याने आपण पैसे मागितले नसल्याचे सांगितले. तेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

टॅग्स :PuneपुणेAmericaअमेरिकाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम