शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
4
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
5
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
6
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
7
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
8
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
9
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
10
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
11
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
12
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
13
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
15
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
16
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
17
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
19
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
20
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!

अस्वच्छता करणाऱ्यांना पालिकेचा दणका; साडेचार हजार नागरिकांकडून तब्बल ३६ लाखांचा दंड वसूल

By राजू हिंगे | Updated: January 22, 2025 19:02 IST

या कारवाईत ४ हजार ५१९ नागरिकांकडून तब्बल ३६ लाख ३४ हजार ३५२ रुपयांचा दंड वसूल

पुणे : शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या आणि सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या बेशिस्त नागरिकांविरुद्ध नवीन वर्षात कारवाईचा फास आवळला आहे. महापालिकेकडून १ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीत शहरात दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत ४ हजार ५१९ नागरिकांकडून तब्बल ३६ लाख ३४ हजार ३५२ रुपयांचा दंड वसूल केला आहे.महापालिकेकडून यापूर्वी शहरात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांकडे जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, दैनंदिन कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या कामामुळे क्षेत्रीय कार्यालयांकडून शहरात प्रभावी कारवाई होत नव्हती. त्यामुळे महापालिकेने इंदोर महापालिकेच्या धर्तीवर क्षेत्रीय कार्यालयस्तरावर गस्त पथकांची निर्मिती करून त्यांना स्वतंंत्र वाहने दिली आहेत. अशी १५ पथके असून, त्यासोबतच आणखी तीन पथके परिमंडळ स्तरावर या विशेष वाहनांमधून शहरात गस्त घालतात. त्यांच्यावर शहरात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे आणि त्यांची जनजागृती करणे एवढीच जबाबदारी देण्यात आली असल्याने शहरात प्रभावीपणे कारवाई होत असल्याचे चित्र आहे.या कारवाईत सर्वाधिक १८ लाख २१ हजार रुपयांचा दंड सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांकडून वसूल करण्यात आला आहे. याशिवाय बांधकाम राडारोडा उघडल्यावर टाकल्याप्रकरणी ५ लाख ५८ हजार १५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपायुक्त संदीप कदम यांनी स्पष्ट केले. रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून १ लाख २६ हजार, उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांकडून ९१ हजार ७००, कचरा जाळल्याप्रकरणी ५५ हजार, बांधकामाच्या राडारोडा प्रकरणी ५ लाख ५८ हजारांचा दंड वसूल केला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रMuncipal Corporationनगर पालिकाpollutionप्रदूषण