शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बीएचआर प्रकरण: विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण याच्यावर १ कोटी २२ लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 23:43 IST

crime News: २ कोटी रुपयांची मागणी करुन १ कोटी २२ लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : जळगाव मधील गाजलेल्या भाईचंद हिरांचद रायसोनी क्रेडिट सोसायटीतील (बीएचआर) घोटाळा प्रकरणात जामीन मिळवून देण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन २ कोटी रुपयांची मागणी करुन १ कोटी २२ लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये विशेष लेखापरिक्षक शेखर सोनाळकर (रा. जळगाव) आणि उदय नानाभाऊ पवार (रा. चाळीसगाव, जळगाव) यांचाही समावेश आहे.

याप्रकरणी सुरज सुनिल झंवर (वय ३१, रा. जळगाव) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बीएच आरच्या गुन्ह्यात सुनिल झंवर यांना जामीन मिळण्याकामी सहकार्य करेन. पैसे दिले नाही तर तुन्हा दोघांना नुकसान पोहचवेल. जामीन मिळवून देणार नाही. तसेच कोथरुडमधील गुन्ह्यात फिर्यादी यांना अडकविण्याची धमकी देऊन २ कोटी रुपयांची मागणी केली. त्यातील १ कोटी रुपये चव्हाण यांनी स्वत:कडे ठेवले व २० लाख रुपये उदय पवार याने मध्यस्थ म्हणून स्वत:साठी घेतले व २ लाख रुपये हवाल्याच्या मोबदला म्हणून चाळीसगाव येथील ओरिजनल वाईन शॉप येथे २६ नोव्हेबर २०२१ रोजी घेतले. तसेच जामिनासाठी मदत केली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

काय आहे प्रकरणबीएचआर सोसायटी ठेवीदारांचे पैसे परत करण्यास असमर्थ ठरल्यामुळे २७ ऑक्टोबर २०१५ मध्ये त्यावर लिक्वीडेटर जितेंद्र कंडारे याची नेमणूक करण्यात आली होती. कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करुन त्या जाहीर ई लिलावाद्वारे विकून ठेवीदारांचे देणी परत करण्याची कार्यवाही करत असताना कंडारे याने सुनिल झंवर इतरांशी संगनमत करुन ठेवीदारांकडून ठेवीच्या पावत्या कमी किंमतीत घेऊन त्यात भष्ट्राचार केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जळगावात मोठ्या प्रमाणावर छापे घालून अनेकांना ताब्यात घेतले. जवळपास टेम्पो भरुन कागदपत्रे जप्त केली होती. या गुन्ह्यात प्रवीण चव्हाण यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तसेच फॉरेन्सिक ऑडिटर म्हणून शेखर सोनाळकर यांची नेमणूक करण्यात आली होती. या गुन्ह्यात सुनिल झंवर यांना १० ऑगस्ट २०२१ रोजी अटक करण्यात आली. त्यांच्या जामिनासाठी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी वेळोवेळी विरोध केला. ११ ऑगस्ट २०२१ रोजी प्रविण चव्हाण यांनी त्रयस्थामार्फत फिर्यादीला निरोप दिला की, तुझ्या वडिलांची ४-५ वर्षे जेलमध्ये वाट लावून टाकतो, मी या पूर्वी सुरेशदादा जैन, डिएसकेचे कुलकर्णी व इतर आरोपींची देखील वाट लावलेली आहे. तुमच्या कुटुंबीयांची जप्त केलेली बँक खाती पुढील १० वर्षात मुक्त होऊ देणार नाही, तेव्हा काही तर पुर्तता करर तरच फायदा होईल, अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांनी २६ नोव्हेबर २०२१ रोजी उदय पवार याच्याकडे १ कोटी २२ लाख रुपयांची खंडणी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सुनिल झंवर यांना २२ फेब्रुवारी २०२२ रोजी जामीन मिळाला. त्यानंतर फिर्यादी यांनी आपल्या वडिलांना या खंडणीविषयी सांगितले. त्यानंतर त्यांनी उदय पवार याच्याशी संपर्क साधल्यावर त्याने चव्हाण याच्याशी संपर्क साधल्यावर तुझे बँक खाते कसे ओपन होता ते पाहतो, तुला इतर दोन केसमध्ये देखील तोंड द्यावे लागेल, अशी धमकी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे