शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री लपून झाडांची कत्तल केल्याप्रकरणी पाेलिसांकडून पुण्यातील गेरा बिल्डरवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 08:00 IST

पिंपरीतील जाॅगिंग ट्रॅकवर १७ मे रोजी घडलेला प्रकार वृक्षमित्रांमुळे आला उघडकीस

पुणे :  पिंपरी चिंचवड महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी न घेता वृक्षतोड केल्याप्रकरणी गेरा इम्पिरियल गेट वे, गेरा डेव्हलपमेंट प्रा. लि. आणि कुमार गेरा, विजय कल्याणकर, बालाजी खांडेकर यांच्यावर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार १७ ते १८ मे रोजी घडल्याचे उघडकीस आले आहे.

नाशिक फाटा ते भोसरी रस्त्यावर वीज कंपनीचे कार्यालय ते सीआयआरटीच्या जाॅगिंग ट्रॅकवर दोन वृक्षमित्रांमुळे हा प्रकार उघडकीस आला. संशयितांनी वृक्ष प्राधिकरण समितीची कोणतीही परवानगी न घेता वृक्षतोड केली. त्यानंतर पंचनामा करून महापालिकेने नोटीस बजावली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाचे सहायक सुरेश घोडे (रा. गुलाबपुष्प उद्यान, नेहरूनगर) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत गुरव तपास करीत आहेत. मोरवाडी येथील दिवाणी न्यायालयात याबाबत खटला चालविला जाईल. 

फिर्यादीत काय म्हटले आहे... घोडे यांनी फिर्यादीत म्हटले की, दि. १८ मे रोजी वृक्षमित्र संजय औसरमाल आणि सागर कसबे यांनी संबंधित ठिकाणी वृक्षतोड झाल्याचे फोनवरून सांगितले. त्यानंतर सकाळी दहा वाजता उद्यान विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. एकूण दहा झाडे तोडल्याचे निदर्शनास आले. त्यातील काही झाडे मुळांसह आणि काही झाडांच्या फांद्या तोडल्या होत्या. काही झाडांच्या खोडाला इजा पोहोचवून, वाळलेले वृक्ष तोडून नुकसान केल्याचे आढळले. तेथे गेरा इम्पिरियल गेट वे आणि गेरा बिल्डरचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्याचे मालक कुमार गेरा, विजय कल्याणकर,  बालाजी खांडेकर असून त्यांना वृक्षतोडीबाबत विचारले असता त्यांनी झाडे तोडण्याची कोणतीही परवानगी घेतली नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांत तक्रार दिली. संबंधितांनी विनापरवाना वृक्षतोड करून सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान केले आहे. 

या कलमान्वये गुन्हा दाखलमहाराष्ट्र झाडे तोडणे (नियमन) अधिनियम १९६४ कलम ३/१, महाराष्ट्र झाडे तोडणे (नियमन)  अधिनियम १९६४ कलम ४ आणि  महाराष्ट्र (नागरिक क्षेत्र) झाडांचे सर्वेक्षण व जतन अधिनियम १९७५ कलम २१/१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

काय आहे नियम...महापालिका क्षेत्रातील झाडांची वृक्षतोड करण्यासाठी महापालिका उद्यान विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. विनापरवाना झाड तोडल्यास ५० हजार रुपये दंड, विनापरवाना झाड छाटल्यास १० हजार रुपये किंवा दोन वर्षांचा कारावास, अशी तरतूद आहे. 

परवानगी न घेता वृक्षतोड केल्याबाबत गेरा इम्पिरियल गेट वे, गेरा डेव्हलपमेंट प्रा. लि. व कुमार गेरा, विजय कल्याणकर, बालाजी खांडेकर यांना नोटीस दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  - रविकिरण घोडके, सहायक आयुक्त उद्यान विभाग.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी