शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड गावातील १०२ वर्षांच्या आजोबांची मतदानाची अविरत परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 09:04 IST

आजपर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करून आपला हक्क बजावला

पुणे : स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीपासून आज म्हणजेच २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावणारे १०२ वर्षांचे आजोबा म्हणजेच नांदेड गावचे ग्रामस्थ निवृत्ती दारवटकर.१९ मे १९२३ रोजी सिंहगड रस्त्यावरील नांदेड गावात जन्मलेल्या निवृत्ती दारवटकर यांनी नुकतेच वयाच्या १०२ वर्षात पदार्पण केले आहे. या वयातही त्यांची अपार इच्छाशक्ती तरुणाईला लाजवेल अशीच आहे. ते सर्वप्रथम १९५२ साली झालेल्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीमध्ये सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या १९६२ पासून होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सहभागी होण्याचे भाग्यदेखील लाभल्याचे ते अभिमानाने सांगतात. आजपर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करून आपला हक्क बजावला आहे.निवृत्ती दारवटकर यांचे शिक्षण इयत्ता तिसरीपर्यंत झालेले असून त्यांना मोडी लिपी अवगत आहे. ते आजही मोडी लिपी वाचू शकतात, तसेच लिहूदेखील शकतात. कुस्ती क्षेत्रात त्यांना लहानपणापासूनच रुची असल्याने त्यांनी त्यामध्येदेखील नावलौकिक मिळविला आहे. निवडणुकीमध्ये मतदानासाठी वयाचे कोणतेही कारण न सांगता ते आपल्या नातवंडांना बरोबर घेऊन मतदान केंद्रावर जाऊनच मतदान करत असल्याचे त्यांचे नातू अजय दारवटकर यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Votingमतदान