रिमोट कंट्रोलने चोरली ९८ लाखांची वीज, पुण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 02:41 PM2022-07-05T14:41:09+5:302022-07-05T14:42:07+5:30

रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

98 lakh electricity stolen by remote control, case registered in Pune | रिमोट कंट्रोलने चोरली ९८ लाखांची वीज, पुण्यात गुन्हा दाखल

रिमोट कंट्रोलने चोरली ९८ लाखांची वीज, पुण्यात गुन्हा दाखल

googlenewsNext

पुणे :महावितरणच्या भरारी पथकाने रावेतमध्ये रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने वीजमीटरमध्ये फेरफार करून बांधकामासाठी वापरण्यात येत असलेली २ लाख ४ हजार २९२ युनिटची अर्थात ९८ लाख ८ हजार ४४० रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

रावेत येथील रवी खिलुमन ओछानी या ग्राहकाकडील वीजमीटर व संचाची महावितरणच्या भरारी पथकाकडून तपासणी करण्यात आली. यामध्ये वीजमीटरमध्ये रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने फेरफार करून इमारतीच्या बांधकामासाठी गेल्या १८ महिन्यांमध्ये २ लाख ४ हजार २९२ युनिटची म्हणजे ९८ लाख ८ हजार ४४० रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले. याप्रकरणी ओछानी विरुद्ध रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी भरारी पथकाचे उपकार्यकारी अभियंता अनिल कुराडे, सहायक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी शुभांगी पतंगे व सहकाऱ्यांनी भाग घेतला.

Web Title: 98 lakh electricity stolen by remote control, case registered in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.