शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिक डीएसकेंच्या संपत्ती लिलावाबाबत ९३ हरकती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 20:20 IST

१३ आलिशान गाड्यांचा १५ फेब्रुवारीला लिलाव

ठळक मुद्देसंपत्तीची विक्री करण्याबाबत जाहीर नोटीस काढावी, असे न्यायालयाचे आदेशआत्तापर्यंत १ हजार ६५० कोटींची स्थावर मालमत्ता जप्त

पुणे : राज्य शासन आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी)ने जप्त केलेल्या बांधकाम व्यावसायिक डीएसके यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यासाठी जाहीर नोटीस काढण्याचे आदेश दिले होते. याबरोबरच त्यावर हरकती देखील मागविल्या होत्या. या प्रकरणात ९३ हरकती आल्या आहेत, अशी माहिती आर्थिक व सायरबर गुन्हेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांचे नातेवाईक यांच्या सुमारे ४६३ स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केल्या आहेत.  ठेवीदारांचे पैसे परत मिळावे म्हणून त्यांची विक्री करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने या संपत्तीची विक्री करण्याबाबत जाहीर नोटीस काढावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते. नोटीस काढल्यानंतर संबंधित संपत्तीबाबत कुणाची हरकत असल्यास त्यांनी ३ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहून आपल्या हरकती नोंदवाव्यात. त्या हरकतींचा निपटारा झाल्यानंतर पुढील कार्यवाही करणार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याप्रकरणात आत्तापर्यंत १ हजार ६५० कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे, ग्राहकांना त्यांचे पैसे लवकर मिळावे यादृष्टीने नोटीस काढल्याने ९३ हरकती व सुचना नोंदविला आहे.  

 १३ आलिशान गाड्यांचा १५ फेब्रुवारीला लिलावडीएसकेंच्या वाहनांचा लिलाव १५ फेब्रुवारीला होणार आहे. त्यांच्याकडे एकूण ४६ वाहने आहेत. त्यापैकी २० वाहने जप्त केली आहेत. जप्त केलेल्या वाहनांपैकी १३ आलिशान गाड्यांचा १५ फेब्रुवारी रोजी लिलाव होणार आहे. या वाहनांची किंमत दोन कोटी ५७ लाख ५० हजार रुपये आहे.

चारचाकी वाहन अर्जदाराच्या नावे करण्याची मागणी अर्जदार करणसिंग परदेशी यांना डीएसकेंकडून १० लाख ३५ हजार रुपये येणे असून त्याबाबत डीएसकेंनी यासंदर्भात अर्जदाराला परतफेडीबाबत धनादेश दिले होते. डीएसकेंकडून मालमत्ता जप्त केली आहे. त्यापूर्वी लिलाव प्रक्रीया पार पडणार आहे. त्या प्रक्रीयेस बराच कालावधी लागू शकतो, अशी शक्यता पाहता अर्जदाराने रक्कम परत मिळावी असा अर्ज दाखल केला आहे. तरी ही रक्कम देण्यास वेळ लागणार असून अर्जदार यांनी डीएसकेंच्या जप्त केलेल्या चार चाकी वाहनांपैकी अर्जदार यांच्या किंमतीचे चारचाकी वाहन आपल्या नावे करावे, अशी मागणी केली आहे.   - अ‍ॅड. सुदीप केंजळकर, अर्जदाराचे वकील  

टॅग्स :PuneपुणेD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीPoliceपोलिसCourtन्यायालय