नारायणगाव येथे देहविक्रय करणाऱ्या ९ महिलांना अटक, लॉजमालकांसह संबंधितांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 03:09 IST2018-04-05T03:09:57+5:302018-04-05T03:09:57+5:30
मौजे कांदळी व आळेफाटा परिसरात वेश्या व्यवसायासाठी मुली व महिला आणण्यात आल्याची माहिती नारायणगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मौजे कांदळी येथील हॉटेल योगिराज लॉजवर केलेल्या कारवाईअंतर्गत मुंबई, पुणे व कोलकाता येथील एकूण ९ पीडित मुली आढळून आल्या.

नारायणगाव येथे देहविक्रय करणाऱ्या ९ महिलांना अटक, लॉजमालकांसह संबंधितांवर गुन्हा दाखल
नारायणगाव - मौजे कांदळी व आळेफाटा परिसरात वेश्या व्यवसायासाठी मुली व महिला आणण्यात आल्याची माहिती नारायणगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मौजे कांदळी येथील हॉटेल योगिराज लॉजवर केलेल्या कारवाईअंतर्गत मुंबई, पुणे व कोलकाता येथील एकूण ९ पीडित मुली आढळून आल्या. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच या संबंधित लॉजमालक, व्यवस्थापक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी लॉजचालक कृष्णा सुरेश फरपट (वय ३०, रा. नारायणगाव, मूळ रा. खामखेड, जि. बुलडाणा), लॉज व्यवस्थापक अजय रूपलाल राजने (रा. कांदळी, रा. पतराडे, अमरावती) आणि लॉजमालक शेषमल हारकू लांडगे (रा. वडगाव, कांदळी, ता. जुन्नर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
भीमा यशवंत लोंढे पोलीस हवालदार यांनी त्यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, पोलीस निरीक्षक कैलास घोडके व सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या पथकाने आळेफाटा व परिसरातील सर्व लॉजची तपासणी केली असता कांदळी गावातील हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायासाठी या मुली व महिला आणण्यात आल्याचे
उघड झाले.
मुंबई व कोलकाता येथील एकूण ९ पीडित मुली आढळून आल्या. त्यानुसार पोलिसांनी लॉजचालक व व्यवस्थापक यांना अटक करून स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची (दि. ७ पर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.