पुणे : शहरातील सिंहगड रस्त्यावर असलेल्या विविध सोसायट्यांमध्ये शनिवारी पहाटे माथेफिरूने लावलेल्या आगीत तब्बल ८४ दुचाकी व सहा मोटारी जळून खाक झाल्या आहेत़ दरम्यान, वाहनांना आगी लावणारा समाजकंटक पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत़ तर सूर्यनगरीसह काही सोसायट्यांमधील वीजमीटर, वायरिंगही जळाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. डॉमिनोज पिझ्झाजवळ आग लागल्याचे अग्निशामक दलाला पहाटे चारच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षातून कळविण्यात आले. या ठिकाणी दुसऱ्या मजल्यापर्यंत आगीचा लोळ पसरला होता. अग्निशमन दलाचे अधिकारी या ठिकाणी जाऊन आग शमवित असतानाच मागील सनसिटीमधील सूर्यनगरीतील नागरिक पार्किंगमध्ये वाहनांना आग लागल्याची तक्रार घेऊन आले. त्यानंतर पहाटे साडेपाचपर्यंत सर्व ठिकाणच्या आगी आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले़ (प्रतिनिधी)
पुण्यामध्ये ९० वाहनांची जाळपोळ !
By admin | Updated: June 29, 2015 03:33 IST
शहरातील सिंहगड रस्त्यावर असलेल्या विविध सोसायट्यांमध्ये शनिवारी पहाटे माथेफिरूने लावलेल्या आगीत तब्बल ८४ दुचाकी व सहा मोटारी जळून खाक झाल्या आहेत़
पुण्यामध्ये ९० वाहनांची जाळपोळ !
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}