87.23%जिल्ह्याचा निकाल
By Admin | Updated: May 26, 2016 03:35 IST2016-05-26T03:35:26+5:302016-05-26T03:35:26+5:30
इयत्ता बारावीचा जिल्ह्याचा एकूण निकाल ८७.२३ टक्के लागला असून, मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ९२.१० टक्के मुली, तर ८३.१८ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.

87.23%जिल्ह्याचा निकाल
पुणे : इयत्ता बारावीचा जिल्ह्याचा एकूण निकाल ८७.२३ टक्के लागला असून, मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ९२.१० टक्के मुली, तर ८३.१८ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. पुणे विभागात जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे.
बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यात १ लाख १४ हजार ६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख १३ हजार ९१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यामध्ये ४७ हजार ६४४ मुलींचा समावेश आहे, तर ५१ हजार ७३० मुले उत्तीर्ण झाली आहेत. वेल्हा तालुक्याचा निकाल जिल्ह्यात सर्वाधिक लागला आहे. तर सर्वांत कमी निकाल मावळ तालुक्याचा ८२. ६८ टक्के लागला आहे. सर्वच तालुक्यांमध्ये मुलींची निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा अधिक आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा १० टक्के अधिक आहे.
जिल्ह्याच्या तालुकानिहाय निकालाची टक्केवारी
आंबेगाव - ९१.४६
बारामती - ८९.५९
भोर - ८५.३९
दौंड - ८४.५१
हवेली - ८५.३३
इंदापूर - ८९.१५
जुन्नर - ८६.६०
खेड - ८६.६९
मावळ - ८२.६८
मुळशी - ८४.४८
पुरंदर - ८६.९८
शिरूर - ९०.३०
वेल्हा - ९३.७३
पुणे शहर (प.) - ८७.२०
पुणे शहर (पू.) - ८५.५२
पिंपरी चिंचवड - ९०.०१
विभाग निहाय व
श्रेणी निहाय उत्तीर्ण विद्यार्थी
विभाग७५% व पुढे६०% व पुढे
पुणे१२,७७६७,०५३
नागपूर७,६०५४०,९१३
औरंगाबाद११,८९९७०,०४४
मुंबई३३,३७३८६,६२२
कोल्हापूर६,५४३३५,८९७
अमरावती८,८५५५०,०१९
नाशिक५,४३९५४,२१०
लातूर५,६६०२५,३५१
कोकण१,९७८११,५५८
काही वर्षांपासून राज्य मंडळाच्या निकालाच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत चालली होती. सीबीएसई बोर्डाप्रमाणे राबविलेल्या जात असलेल्या ८०/२० पॅटर्नमुळे कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना सरसकट २० पैकी २० गुण दिले जात असल्याने निकाल फुगलेला दिसत होता. मात्र, यंदा प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेसाठी बहि:स्थ परीक्षकांची नियुक्ती केली. त्यामुळे बारावीच्या २०१६ च्या निकालात ४.६६ टक्क्यांनी घट झाली.
आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल चांगला लागावा, या हेतूने काही शिक्षकांकडून प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांचे गुण सढळ हाताने दिले जात होते. परिणामी विद्यार्थ्यांना १५ ते २० टक्के गुण सहज मिळत होते. त्यामुळेच निकालाची टक्केवारी वाढत चालली होती. मात्र, राज्य मंडळाने यंदा बारावीच्या परीक्षेसाठी रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी बहि:स्थ परीक्षांची नियुक्ती केली होती. त्याचप्रमाणे पर्यावरण शिक्षण परीक्षेसाठीही बहि:स्थ शिक्षक नियुक्त करण्यात आले.त्यामुळे विद्यार्थ्यांना सढळ हाताने दिल्या जाणाऱ्या गुणांवर यंदा नियंत्रण आले. त्याचप्रमाणे गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रांना अचानक भेटी दिल्या जात होत्या. त्यामुळे यंदा बारावीच्या निकालात काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते.
- गंगाधर म्हामणे, राज्य मंडळाचे अध्यक्ष