वायूदलाचा ८५ वा वर्धापन दिन उत्साहात : शहिदांना दिली मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 18:34 IST2017-10-10T18:33:11+5:302017-10-10T18:34:33+5:30

भारतीय वायूदलाचा ८५ वा वर्धापन दिन लोहगाव विमानतळावर रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांसाठी लढाऊ विमाने, तसेच शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

85th anniversary of airforce: Excitement for the martyrs | वायूदलाचा ८५ वा वर्धापन दिन उत्साहात : शहिदांना दिली मानवंदना

वायूदलाचा ८५ वा वर्धापन दिन उत्साहात : शहिदांना दिली मानवंदना

ठळक मुद्देभारतीय वायूदलाच्या ८५व्या वर्धापन दिनानिमित्त लोहगाव एअरफोर्स स्टेशन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देत शस्त्रांची माहिती कुतूहलाने जाणून घेतली.

पुणे : भारतीय वायूदलाचा ८५ वा वर्धापन दिन लोहगाव विमानतळावर रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांसाठी लढाऊ विमाने, तसेच शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. एअर कमोडर के. व्ही. सुरेंद्रन नायर यांनी युद्धस्मारकाला पुष्पहार अर्पण करून या वेळी शहिदांना आदरांजली वाहिली. 
भारतीय वायूदलाच्या ८५व्या वर्धापन दिनानिमित्त लोहगाव एअरफोर्स स्टेशन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लढाऊ विमाने, शस्त्रप्रणाली, विविध शस्त्रे या वेळी आयोजित प्रदर्शनात मांडली होती. हे प्रदर्शन पाहण्यासाठी पुण्यातील शाळा, तसेच नागरिकांना खुले ठेवण्यात आले होते. विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देत शस्त्रांची माहिती कुतूहलाने जाणून घेतली. या वेळी अधिकाºयांनी भारतीय सीमा, तसेच संविधानाच्या संरक्षणासाठी शपथ घेतली. 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोहगाव एअरफोर्स स्टेशनचे प्रमुख एअर कमोडर के. व्ही. सुरेंद्रन नायर यांनी येथील युद्धस्मारकाला भेट दिली. त्यांनी पुष्पचक्र अर्पण करीत शहिदांना आदरांजली वाहिली. या वेळी आयोजित कार्यक्रमात वायूसेनेचे विविध अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Web Title: 85th anniversary of airforce: Excitement for the martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे