शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

ओल्या कचऱ्यापासून दर महिन्याला ८५० टन सेंद्रिय खत तयार; पुणे महापालिकेचा उपक्रम

By निलेश राऊत | Updated: August 17, 2023 17:00 IST

जुलै २०२३ पर्यंत तब्बल ६१ हजार २०० मेट्रिक टन सेंद्रिय खत निर्मिती करण्यात आली असून, हे खत शेतकऱ्यांना नाममात्र दरामध्ये उपलब्ध करून दिले गेले

पुणे: महापालिकेच्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्पाला राज्य शासनाने ' हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड ' वापरण्याची मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित ठेकेदार कंपनीला शहरी सेंद्रिय खत तयार करून शेतकऱ्यांना विक्रीसाठी आता राज्यभर खत विक्री करता येणार आहे.      दरम्यान राज्य शासनाकडून ही मान्यता मिळण्यापूर्वीच महापालिका भुमी ग्रीन एनर्जी या ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून दररोज २०० में.टन क्षमतेच्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून दर महा पासून ८५० में.टन सेंद्रिय खत तयार करीत असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी दिली.        महापालिकेकडून ओला व सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया केली जाते. यात जुलै २०१७ पासून ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जात आहे. जुलै २०२३ पर्यंत तब्बल ६१ हजार २०० मेट्रिक टन सेंद्रिय खत निर्मिती करण्यात आली असून, हे खत शेतकऱ्यांना नाममात्र दरामध्ये  उपलब्ध करून दिले गेले आहे. महापालिकेच्या हडपसर येथील कचरा रॅम्पवर येथे १५० टन तर उरुळी देवाची येथील कचरा डेपोत ३५० टन क्षमतेचे प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आले आहेत. याठिकाणी दररोज येणारा ओला कचरा टीफिने फ्लोर  वरती घेतला जातो. व ओल्या कचऱ्यावरती जैविक डीकॉम्पोसरची फवारणी केली जाते. त्यानंतर फावरणी केलेल्य मालची हिप केली जाऊन, त्यामधूम पाणी कमी होण्यासाठी मालाची अदला- बदल केली जाते. ४५ दिवसांनी तयार झालेल्या मालाची प्रोसेसिंग करून,त्यातून कम्पोस्टिंग झालेले मालापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाते. या दोन्ही प्रकल्पातील खताचे नमुने महापालिकेने शासनाच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. हे खत तपासून त्याची गुणवत्ता योग्य असल्याचे नमूद करून शासनाने स्वच्छ  महाराष्ट्र अभियानातंर्गत ' हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड ' ची महापालिकेला मान्यता दिली असल्याचे राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाFarmerशेतकरीSocialसामाजिकWaterपाणी