शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

८५ लाख शेतकऱ्यांना दसऱ्यानंतर धनलाभ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीत वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 05:52 IST

‘नमो किसान’ लाभार्थींच्या  याद्या आज होणार अंतिम

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारनेदेखील शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’ एप्रिलमध्ये जाहीर केली होती. त्यानुसार ‘पीएम किसान योजने’च्या १४ व्या हप्त्याचा लाभ मिळालेल्या राज्यातील ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना ‘नमो किसान योजने’तून पहिला हप्ता गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे वितरित करण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभार्थींची जिल्हानिहाय संख्या आज (रविवारी) अंतिम केली जाणार असल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले.

पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे, खात्यांना ‘आधार’ची जोडणी करणे या निकषांची अंमलबजावणी पूर्णपणे करण्यात आली नव्हती.  पंधराव्या हप्त्यासाठी हे निकष बंधनकारक आहेत राज्याच्या योजनेसाठीही हे निकष लागू केले आहेत. पीएम किसान योजनेमध्ये चौदाव्या हप्त्यासाठी ८५ लाख ६० हजार ७३ शेतकऱ्यांना लाभार्थी म्हणून मान्यता दिली होती.

सोमवारी पैसे जमा होणार

राज्यासाठी देखील पीएम किसान पोर्टलसारखेच स्वतंत्र पोर्टल तयार करण्याची जबाबदारी ‘महाआयटी’कडे देण्यात आली आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. रविवारी जिल्हानिहाय शेतकऱ्यांच्या याद्या अंतिम होतील. राज्य सरकारने पहिल्या हप्त्यासाठी १ हजार ७२० कोटी निधी दिला असून, संबंधित बँकांकडे सोमवारी वितरित केला जाणार आहे. शिर्डीत गुरुवारी लाभार्थींना दोन हजार रुपयांचा हप्ता वितरित करतील. ‘पीएम-किसान योजने’तील लाभार्थी संख्येच्या तुलनेत नमो किसान योजनेतील लाभार्थींच्या संख्येत फार फरक पडणार नाही, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना