Pune Corona News: दररोज नवा उच्चांक; मंगळवारी शहरात 'तब्बल ८३०१' कोरोनाबाधितांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 20:05 IST2022-01-21T20:04:41+5:302022-01-21T20:05:39+5:30
शहरातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ४५ हजार ८१ इतकी झाली

Pune Corona News: दररोज नवा उच्चांक; मंगळवारी शहरात 'तब्बल ८३०१' कोरोनाबाधितांची नोंद
पुणे : शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा दररोज नवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. शुक्रवारी शहरात २० हजार ३३८ चाचण्या पार पडल्या. त्यापैकी ८३०१ रुग्ण कोरोनाबधित असल्याचे निदान झाले. त्यामुळे पॉझिटिव्हीटी रेट ४०.८१ टक्के झाला आहे.
शहरातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ४५ हजार ८१ इतकी झाली असून, यापैकी केवळ ३.१९ टक्के बाधित हे रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उर्वरित सर्व रूग्ण गृह विलगीकरणात आहेत. शुक्रवारी ५ हजार ४८० जण कोरोनामुक्त झाले असून, दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला. सध्या विविध रूग्णालयात ४७ रूग्ण इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटरवर, २७ जण नॉन इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटरवर तर २९७ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.
शहरात आत्तापर्यंत ४२ लाख १०५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी ५ लाख ९१ हजार ८३४ जण कोरोनाबाधित आढळून आले. यातील ५ लाख ३७ हजार ५८१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ हजार १७२ जण दगावले आहेत.