शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पुणे-पिंपरी-चिंचवडमधील ८१२ म्हाडाच्या घरांसाठी सोडत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 12:05 PM

या सोडतीसाठी येत्या ६ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे..

ठळक मुद्देअ‍ॅमेनेटीजचे द्यावे लागणार वेगळे पैसे : म्हाडाच्या ८१२ घरांची सोडत जाहीर स्वस्ताई प्रकल्पावर अवलंबूनपुणे महानगरपालिका हद्दीतील २४२ आणि पिंपरी -चिंचवडमधील ५७० घरांची सोडत होणारयातील घरे ही अत्यल्प आणि अल्प उत्पन्नगटातील व्यक्तींसाठी राखीव ठेवणे बंधनकारकसदनिकांची सोडत १९ डिसेंबरला सकाळी ११ वाजता कौन्सिल हॉलमागील अल्पबचत भवन येथे सोडतीची सर्व प्रक्रिया आॅनलाईन

पुणे : पुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळातर्फे (म्हाडा) पुणे-पिंपरी-चिंचवडमधील ८१२ परवडणाऱ्या घरांसाठी सोडत गुरुवारी (दि. २२) जाहीर झाली. या सोडतीसाठी येत्या ६ डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. मात्र, प्रकल्पानुसार अ‍ॅमेनिटीजची वेगळी किंमत ग्राहकांना भरावी लागणार असल्याने म्हाडाच्या घरांची स्वस्ताई संबंधित प्रकल्पात असलेल्या सोयी-सुविधांवर अवलंबून असणार आहे. म्हाडाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परीषदेत सोडतीची माहिती दिली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या भू अभिन्यास धोरणानुसार ४ हजार चौरसमीटरपेक्षा जास्त बांधकाम असलेल्या प्रकल्पांना २० टक्के ज्यादा चटई निर्देशांक क्षेत्र (एफएसआय) वापरण्याची परवानगी दिली जाते. यातील घरे ही अत्यल्प आणि अल्प उत्पन्नगटातील व्यक्तींसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिका हद्दीतील २४२ आणि पिंपरी -चिंचवडमधील ५७० घरांची सोडत होणार आहे. या घरांचे चटई क्षेत्रफळ ३० ते ६० चौरस मीटर असून, त्यांची किंमत १० लाख ९२ हजार ६०० ते १९ लाख ५६ हजार १३४ रुपयांदरम्यान राहील. वाकड, पुनावळे, पिंपळे-सौदागर, ताथवडे, किवळे रहाटणी, पिंपळे निलख, बोºहाडेवाडी, मोशी, चिखली आणि चोवीसवाडी येथे हे प्रकल्प उभे राहत आहेत. बुधवारी (दि. २१) दुपारी बारा वाजता या योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली. येत्या ६ डिसेंबर रोजी रात्री बारा पुर्वी या योजनेसाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारले जातील. बँकेत आरटीजीएस अथवा एनइएफटीद्वारे ७ डिसेंबरपर्यंत, तर ९ डिसेंबरला रात्री बारा पुर्वी आॅनलाईन पैसे भरता येतील. त्यानंतर सदनिकांची सोडत १९ डिसेंबरला सकाळी ११ वाजता कौन्सिल हॉलमागील अल्पबचत भवन येथे होईल. सोडतीत नावे आलेल्या उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यांनी नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावरही माहिती दिली जाईल. सोडतीत नावे आलेल्या उमेदवारांना ५ जानेवारी २०१९ पर्यंत सदनिकेची दहा टक्के रक्कम आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागलील. जे उमेदवार दहा टक्के रकमेचा भरणा करणार नाहीत, अथवा कागदपत्रे अपलोड करणार नाहीत, त्यांना अपात्र घोषित केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी www.loyyery.mhada.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. ---------------सोडतीची सर्व प्रक्रिया आॅनलाईनम्हाडाच्या घरांसाठी अर्ज मागविणे, पैसे भरणे या बरोबरच सोडतीत नावे आलेल्या व्यक्तींची कागदपत्रे देखील आॅनलाईन मागविली जाणार आहेत. त्यामुळे म्हाडाच्या सोडतीची सर्व प्रक्रिया आॅनलाईन होणार आहे. अनेकदा नागरिकांना जात वैधता प्रमाणपत्र, कलाकारांना सास्कृतिक संचालनालयाचे प्रमाणपत्र अशी आवश्यक कागदपत्र गोळा करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. त्याची तयारी नागरिकांनी आत्तापासूनच करावी असे आवाहन म्हाडाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली. 

टॅग्स :mhadaम्हाडाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड