शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
4
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
5
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
6
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
7
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
8
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
9
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
10
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
11
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
12
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
13
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
14
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
15
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
16
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
17
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
18
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
19
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
20
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड

सिंहगड, डेक्कन, इंटरसिटी, डेक्कन क्वीन एक्स्प्रेसह मुंबई-पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या ८ रेल्वे रद्द

By अजित घस्ते | Updated: July 8, 2024 18:06 IST

मुसळधार पावसामुळे रेल्वे रद्द झाल्याने आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर जाणार्‍या चाकरमान्यांना फटका बसला

पुणे : मुंबईत रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेची दणादाण उडाली. मुंबई विभागातील कल्याण-कसारा विभागातील खडवली-टिटवाळा दरम्यान पाणी साचल्यामुळे पुणे-मुंबई दरम्यान धावणार्‍या सिंहगड, डेक्कन, इंटरसिटी आणि डेक्कन क्वीन एक्स्प्रेसह आठ गाड्या रद्द करण्यात आले. यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर जाणार्‍या चाकरमान्यांना फटका बसला. रविवारी रात्री मुंबईमध्ये मुुसळधार पाऊस झाला. यामुळे रेल्वे रुळावर पाणी साचले होते. त्यामुळे अनेक मार्गावर ठिकठिकाणी रेल्वे थांबण्यात आले होते. तर काही ठिकाणी ठिकाणी धीम्या गतीने वाहतूक सुरु होती. मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा विभागातील खडवली-टिटवाळादरम्यान रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे सोमवारी सकाळी रेल्वेची सेवा विस्कटली होती. त्यामुळे पुण्यातून मुंबईकडे जाणार्‍या चार गाड्या आणि मुंबईतून पुण्याला येणार्‍या चार गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्याचा फटका चाकरमान्यांना बसला. तसेच मुंबईतून सकाळी निघणार्‍या उद्यान, कोयना, चैनई, हैदराबाद एक्स्प्रेस या गाड्या तीन ते चार तास उशिरा धावल्या. तसेच मुंबईतून पुण्याकडे येणार्‍या सिंहगड, डेक्कन, इंटरसिटी आणि डेक्कन क्वीन रद्द करण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेRainपाऊसpassengerप्रवासीenvironmentपर्यावरणSocialसामाजिक