शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील ७७ वर्षीय जादुगाराची कमाल; आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बक्षीस मिळवून केली धमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 18:12 IST

आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळवल्याने भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.

ठळक मुद्देशालेय वयातच त्यांनी जादुचे प्रयोग शिकण्यास केला प्रारंभ

पुणे : इंटरनॅशनल ब्रदरहूट ऑफ मॅजिशियन्स, अमेरिका यांच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतराराष्ट्रीय जादूगारांच्या स्पर्धेत पुण्यातील ज्येष्ठ जादूगार चंद्रशेखर चौधरी यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. ७७ वर्षीय तरुणाने हे आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळवल्याने भारतीयांची मान अभिमानाने उंचावली  आहे.  

या स्पर्धेत श्रीलंका, फिलीपाईस, बांगलादेश, मोरोक्को, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, ब्राझील, मेक्सिको, तुर्कस्तान, रुमानिया, अल्जेरीया, अमेरिका, अझरबेझान व भारतासह २०० नामांकित जादूगारांनी भाग घेतला होता. अमेरिकन जादूगार जिओव्हनी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दुसरा क्रमांक विभागून पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार चंद्रशेखर चौधरी यांनी मिळवला. 

चंद्रशेखर चौधरी यांचे नूतन मराठी विद्यालय प्रशालेमधून शिक्षण झाले आहे. शालेय वयातच त्यांनी जादुचे प्रयोग शिकण्यास प्रारंभ केला. १९६१ पासून जादुचे प्रयोग सादर करण्यास सुरवात केली. स्वतःचा व्यवसाय सांभाळून त्यांनी देश विदेशात अनेक प्रयोग केले. आजवर त्यांना अनेक पारितोषिके मिळाली आहेत. त्यात जादूगार कोशिकदादा पुरस्कार मिळाला होता. (जादूगार के. लाल ज्युनियर तर्फे ) मुंबईच्या असोसिएशन ओफ इल्युजनिस्ट आणि मॅजिशियन्स तर्फे २०१७ साली एक्सलन्स ऑफ गॅलॅक्सी डायमंड अवॉर्ड होते. 

२०१८ साली कोलकाता येथील फेडरेशन ऑफ इंडियन मॅजिशियन असोसिएटने (फिमा) पश्चिम भारताचे संचालक म्हणून नियुक्त केले. त्याचवेळी इंडियन ब्रदरहूड ऑफ मॅजिशियन्स, नवी दिल्ली येथे जादू शिरोमणी अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले. २०१९ साली केरळ येथील कोलम मॅजिशियन्स असोसिएशनतर्फे के एम ए इंद्रजाल पुरस्काराने गौरवण्यात आले होते. इंडियन मॅजिक हॉबी असोसिएशन, तामिळनाडूने तहहयात आश्रयदाते म्हणून नेमणूक केली. जादु व्यतिरिक्त चंद्रशेखर चौधरी हे इलेक्ट्रिक व ओटोमोबाईल दिव्यांचे तज्ञ म्हणून ओळखले जातात. त्या क्षेत्रात त्यांचा ६० वर्षाचा अनुभव असुन जगातील सर्वात मोठा दिव्यांचा संग्रह त्याच्याकडे आहे.

टॅग्स :PuneपुणेSocialसामाजिकInternationalआंतरराष्ट्रीयAmericaअमेरिका