शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

पुणे जिल्ह्यात लसीकरणानंतरही ७ हजार ६३६ पॉझिटिव्ह; मात्र रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण नगण्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 11:09 IST

लसीकरण झाल्यावर कोरोना आपल्या आसपासही फिरकू शकणार नाही, या गैरसमजातून बहुतांश नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम धाब्यावर बसवले आहेत

ठळक मुद्देपहिल्या डोस झाल्यावरही ५४६६ जणांना कोरोनाची लागणदुसरा डोस घेतल्यानंतरही २१७० जण कोरोनाग्रस्त

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : लसीकरण झाल्यावर कोरोना आपल्या आसपासही फिरकू शकणार नाही, या गैरसमजातून बहुतांश नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम धाब्यावर बसवले आहेत. लसीकरण झाले म्हणून निष्काळजीपणे वागल्यास कोरोना विषाणूचा विळखा आपल्याला बसल्याशिवाय राहणार नाही, हे आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस घेतल्यावरही ५४६६ जणांना, तर दुसरा डोस घेतल्यानंतरही २१७० जणांना अशा एकूण ७६३६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र लस घेतल्यावरही कोरोनाची लागण झाली तरी सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे दिसू शकतात आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण नगण्य होते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. लस एकूण लसीकरणाच्या तुलनेत हे प्रमाण ०.१ टक्के असले तरी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग हे नियम पाळणे आवश्यक आहे. 

जिल्ह्यात ६ ऑगस्टपर्यंत एकूण ६३,२५,५७९ जणांचे लसीकरण झाले. त्यापैकी ४६,८५,३८१ जणांचा पहिला डोस, तर १६,४०,१९८ जणांना दुसरा डोस मिळाला होता. पहिल्या डोस झाल्यावरही ५४६६ जणांना कोरोनाची लागण झाली. दुसरा डोस घेतल्यानंतरही २१७० जण कोरोनाग्रस्त झाल्याचे आढळून आले. 

विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. अमित द्रविड म्हणाले, ''आपल्याकडे आतापर्यंत पुरेसे लसीकरण झालेले नाही. दोन डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली तरी ती सौम्य स्वरूपाची असते. मात्र, त्यांच्याकडून इतरांना मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ शकतो. अमेरिकेत सर्व व्यवहार खुले झाल्यावर अचानक रुग्णसंख्या वाढली. त्यामुळे लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.दुसरीकडे, लसीकरणाचा वेग वाढण्याची प्रचंड गरज आहे.''

जनरल फिजिशियन डॉ. अनिकेत देशपांडे म्हणाले, ''मागील वर्षी गणेशोत्सवानंतर अचानक रुग्णसंख्या वाढली आणि पहिल्या लाटेतील उद्रेकाचा सामना करावा लागला. पहिली लाट ओसरल्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात नागरिक पर्यटनासाठी, वैयक्तिक कामांसाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले. त्याची परिणती दुसऱ्या लाटेमध्ये झाली. आता सर्व व्यवहार पुन्हा सुरळीत झाले आहेत. तिसरी लाट टाळायची असेल तर नागरिकांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे.''

पॉझिटिव्ह रुग्ण 

             पहिल्या डोसनंतर        दुसऱ्या डोसनंतर

पुणे             २१६२                           १२५१

पिं. चिं.          ६५                                 २३

ग्रामीण       ३२३९                             ८९६

-------------------- ----------------------------------

एकूण          ५४६६                            २१७०

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाdocterडॉक्टर