शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

‘कुकडी’त ७३.१३ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 1:50 AM

कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील सर्व धरणांमध्ये सरासरी ७३़ १३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील सर्व धरणांमध्ये सरासरी ७३़ १३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १0 टक्के पाणीसाठा कमी आहे. डिंभा आणि वडज या धरणांमधून ७.३ टीएमसी पाणी आतापर्यंत नदी व कालव्यात सोडण्यात आलेले आहे़, अशी माहिती माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्ऱ १ चे कार्यकारी अभियंता जी़ बी़ नन्नोर व शाखाधिकारी प्रकाश मांडे यांनी दिली.गेल्या आठवड्यापासून पावसाने ओढ दिली आहे. मात्र आदिवासी पट्ट्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांच्या पातळीत काही का प्रमाणात वाढ होत आहे. डिंभा, वडज व येडगाव धरण हे भरलेले होते़ परंतु या धरणातील नदी व कालव्यात पाणी सोडण्यात आल्याने वडज व येडगाव धरणाची क्षमता कमी झाली आहे़ तीनही धरणांमिळून ७३२४ द़ ल़ घ. फू. पाणीसाठा नदी व कालव्यातून सोडण्यात आले आहे़ डिंभा धरण मात्र पूर्ण क्षमतेने भरलेले आहे़वडज धरणात १ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे़. १ जूनपासून ५३९ मि.मी. पाऊस झाला आहे़ या धरणातून येडगाव धरणात १६0 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे़ मीना नदीत १४६९ दलघफू पाणी सोडण्यात आलेले आहे. माणिकडोह या धरणात ६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे़ १ जूनपासून ७९६ मिमी पाऊस झाला असून, २४ तासांत ७ मि.मी. पाऊ स झाला आहे़ पिंपळगाव जोगा धरणात २ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे़ १ जूनपासून ८२७ मिमी पाऊस झाला असून, २४ तासांत ३ मि़ मी पाऊस झाला आहे़ चिल्हेवाडी धरणात 0.६२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे़ १ जूनपासून ६७३ मि़ मी. पाऊस झाला आहे़ तसेच घोड या धरणात ४़ ५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे़ १ जूनपासून ९७ मिमी पाऊस झाला आहे़ या धरणात वडज धरणातून मीना नदीद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे धरणाचा पाणीसाठा वाढलेला आहे़डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दि़ १ जूनपासून ९६९ मि़ मी. पाऊस झाला असून, २४ तासांत ४ मि़ मी पाऊस झाला आहे. या धरणातून येडगाव धरणात ५५0 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे़, तर उजव्या डावा कालव्यात ३00 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे़ दि़ २६ जुलैपासून विसर्ग सुरू असून आतापर्यंत १२९६ द़ ल़ घ. फू. पाणी या धरणातून विसर्ग करण्यात आले आहे़ घोड ब्रँच व मीना कालव्याला ३५0 दलघफू पाणी सोडण्यात आलेले आहे़ येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दि़ १ जूनपासून ६३६ मि़ मी पाऊस झाला असून, २४ तासांत २ मिमी पाऊ स झाला आहे़ या धरणातून कुकडी कालव्यात ३५0५ दलघफूपाणी सोडण्यात आलेले आहे, तर कुकडी नदीत १८७५ दलघफू पाणी सोडण्यात आलेले आहे़