शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

महापालिका ‘मुठ्ठी में’; ७०६ कोटी थकविण्याची ‘आयडिया’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 12:08 IST

शहरामध्ये एअरटेल, आयडिया, व्होडाफोन, रिलायन्स जिओ, रिलायन्स इन्फ्रा, टाटा टेलिसर्व्हिसेस, भारत संचार निगम आदी १९ मोबाईल कंपन्यांकडून शहराच्या विविध भागात तब्बल २ हजार ३१२ मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत.  

ठळक मुद्देमोबाईल कंपन्यांकडे ७०६ कोटींची थकबाकीरिलायन्स, आयडीया, एअरटेल सर्वांत मोठे थकबाकीदारथकबाकीदार मोबाईल कंपन्यांना रस्ते खोदाईची परवानगी मिळणार काएका वर्षांत ३४ कोटी ४३ लाखांची थकबाकी जमा  शहरात कोणत्याही प्रकारची रस्ते खोदाई करण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक

पुणे:  शहरातील विविध मोबाईल कंपन्यांकडे महापालिकेची तब्बल ७०६ कोटी रुपयांची थकबाकी असून, या बड्या थकबाकीदार कंपन्यांनीच आता महापालिकेकडे रस्ते खोदाई करण्याची परवानगी मागितली आहे. थकबाकी भरल्याशिवाय परवानगी न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.वरीष्ठ अधिकारी या निर्णयावर ठाम राहिल्यास महापालिकेच्या कर वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण होण्यास चांगलाच हातभार लागू शकतो.    शहरामध्ये एअरटेल, आयडिया, व्होडाफोन, रिलायन्स जिओ, रिलायन्स इन्फ्रा, टाटा टेलिसर्व्हिसेस, भारत संचार निगम आदी १९ मोबाईल कंपन्यांकडून शहराच्या विविध भागात तब्बल २ हजार ३१२ मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत.  या मोबाईल टॉवरसाठी  संबंधित कंपन्यांकडून कर आवश्यक आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या मोबाईल कंपन्यांनी करच भरला नसून, सध्या तब्बल ७०६ कोटी ७९ लाख ऐवढी मोठी थकबाकी आहे. थकबाकी भरल्याशिवाय मोबाईल कंपन्यांना रस्ते खोदाईसाठी परवानगी दिली जाणार नसल्याची भूमिका प्रशासनाने घेतली होती.त्यामुळे गेल्या वर्षभरामध्ये संबंधित कंपन्यांकडून ३४ कोटी ४३ लाख रुपयांची थकबाकी महापालिकेकडे जमा केली आहे.    शहरात कोणत्याही प्रकारची रस्ते खोदाई करण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. याबाबत महापालिकेच्या वतीने रस्ते खोदाईसाठी स्वतंत्र धोरण आणले असून, शहर सुधारणा समितीच्या बैठकीत हे धोरण मान्यतेसाठी ठेवण्यात आले आहे. परंतु रस्ते खोदाईचे धोरण मंजुर नसताना महापालिकेच्या मुख्य सभेने मोबाईल कंपन्यांना ओपन ट्रेचिंग रस्ते खोदाई करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  मोबाईल कंपन्यांना रस्ते खोदाई परवानगी देण्याचा निर्णय झाला असला तरी कंपन्यांकडे महापालिकेची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असून, थकबाकी भरल्याशिवाय परवानगी न देण्याचा निर्णय सध्या तरी प्रशासनाने घेतला आहे.------------------सर्वांधिक थकबाकीदारÞरिलायन्स इन्फ्रा : १६१ कोटीएटीसी टेलिकॉम : १५२ कोटीइंडस टॉवर : १२२ कोटी रिलायन्स जिओ : २२ कोटीभारत संचार निगम : ३१ कोटीएअरटेल : ४९ कोटीहग्स : ५८ कोटी ---------------------थकबाकी भरल्याशिवाय परवानगी नाहीशहरामध्ये मोबाईल कंपन्यांना ओपन ट्रेचिंग पध्दतीने रस्ते खोदाई करण्यास परवानगी देण्याचा निर्णय महापालिकेच्या मुख्यसभेत झाला आहे. आतापर्यंत विविध मोबाईल कंपन्यांकडून सुमारे २०० किलो मिटरचे रस्ते खोदईसाठी अर्ज आले आहेत. परंतु संबंधित मोबाईल कंपन्यांनी महापालिकेची थकबाकी भरल्याशिवाय परवानगी देण्यात येणार नाही. यासाठी महापालिकेच्या कर विभागाची एनओसी दाखल गेल्यानंतरच रस्ते खोदाईला परवानगी देण्यात येईल.- अनिरुध्द पावसकर, पथविभाग प्रमुख-----------------------थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न सुरुमोबाईल कंपन्यांकडून शहरामध्ये उभारण्यात आलेल्या टॉवरसाठी महापालिकेला कर भरणे आवश्यक आहे. सध्या मोबाईल कंपन्यांकडे तब्बल ७०६ कोटी रुपयांची थकबाकी असून, गेल्या सहा-सात वर्षांपासून ही थकबाकी वसुल करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. या थकबाकीसंदर्भांत अनेक मोबाईल कंपन्यांना न्यायालयात गेल्या आहेत. परंतु आता थकबाकी भरल्याशिवाय रस्ते खोदाईला परवानगी न देण्याचा निर्णय घेतल्याने चांगली वसुली होईल अशी अपेक्षा आहे.- विलास कानडे, सह महापालिका आयुक्त, कर विभाग

टॅग्स :PuneपुणेMobileमोबाइलReliance Jioरिलायन्स जिओIdeaआयडियाAirtelएअरटेल