शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात मतदानाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सुरक्षा दलासह ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 12:47 IST

पुणे शहर लोकसभा व बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ४५२ इमारतीत २ हजार ५०९ मतदान केंद्रे आहेत़.

ठळक मुद्दे२३ एप्रिलला मतदान : मध्य प्रदेश राज्य राखीव दलाची एक कंपनीकाही अनुचित प्रकार घडल्यास प्रॉम्ट रिपॉन्स टीम असणार ३० पोलीस ठाण्यात फ्लायिंग स्कॉड तसेच सर्व्हेलन्स स्टॅट्रिक फोर्स असणार मतदान झाल्यानंतर सर्व इव्हिएम मशीन कोरेगाव पार्क येथील गोदामात ठेवण्यात येणार

पुणे : पुणे शहरात २३ एप्रिल रोजी मतदान होत असून यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या कंपन्या, राज्य राखीव पोलीस दल, रेल्वे सुरक्षा दल, होमगार्ड यांच्यासह शहर पोलीस दलाचा ७ हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे़. त्याचबरोबर मध्य प्रदेश राज्य राखीव दलाच्या एका कंपनीचा बंदोबस्त असणार आहे़. पुणे शहर लोकसभा व बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ४५२ इमारतीत २ हजार ५०९ मतदान केंद्रे आहेत़. शहरातील ३० पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत मतदानाच्या बंदोबस्तासाठी १५५ पोलीस अधिकारी, १८०० होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाच्या ३ कंपन्या, केंद्रीय सुरक्षा दल, रेल्वे सुरक्षा दल, मध्य प्रदेश राज्य राखीव पोलीस दल यांच्या प्रत्येकी एक कंपन्या तैनात करण्यात येणार आहे़. प्रत्येकी दोन पोलीस ठाण्याचा एक सेक्टर तयार करुन बुथच्या संख्येनुसार बंदोबस्तासाठी एक वाहन, एक अधिकारी व ३ कर्मचारी यांचे जलद कृती दल असणार आहे़ याशिवाय कोठेही काही अनुचित प्रकार घडल्यास प्रॉम्ट रिपॉन्स टीम असणार असून ते घटनास्थळी ३ ते ५ मिनिटात पोहचतील अशी बंदोबस्ताची आखणी केली़. याशिवाय प्रत्येक सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, अपर पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त यांच्याबरोबर १० कर्मचारी यांचा फौजफाटा असेल़. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याचा स्वतंत्र बंदोबस्त असणार आहे़. संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे़. याशिवाय निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार सर्व ३० पोलीस ठाण्यात फ्लायिंग स्कॉड तसेच सर्व्हेलन्स स्टॅट्रिक फोर्स असणार आहे़. ते संपूर्ण मतदारसंघात फिरुन माहिती घेतील व थेट निवडणुक आयोगाला रिर्पोटिंग करणार आहेत़. त्यांच्याबरोबर व्हिडिओग्राफी करणारे पथकही असणार आहे़. .................स्टॉगरुमसाठी तीन स्तरीय बंदोबस्तमतदान झाल्यानंतर सर्व इव्हिएम मशीन कोरेगाव पार्क येथील गोदामात ठेवण्यात येणार आहे़. या ठिकाणी सर्वात आत केंद्रीय सुरक्षा दलाची ३० जणांची तुकडी असेल़. त्यानंतरच्या सर्कलमध्ये राज्य राखीव पोलीस दलाची व त्यानंतर सर्वात बाहेर शहर पोलीस दलाचे पथक २४ तास तैनात करण्यात येणार आहे़. याशिवाय सीसीटीव्हीची निगराणी राहणार आहे़ .

टॅग्स :PuneपुणेVotingमतदानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliceपोलिस