शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘आषाढी वारी’ला पुण्यातून ७०० ‘लालपरी’, एकाच गावातील मोठ्या ग्रुपने बुकिंग केल्यास गाडी थेट गावात जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 19:12 IST

आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने पुणे विभागातील १४ आगारातून एसटी गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

पुणे: ‘आषाढी वारी’ला विठ्ठल दर्शनासाठी पुण्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या असते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने तयारी केली असून, वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता, पुण्यातून सातशे बस पंढरपूरसाठी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

दरवर्षी राज्यातील अनेक वारकरी आणि भाविक पंढरपूरला जाण्यासाठी पुण्यात येतात. शिवाय पुणे जिल्हा आणि शहरातून जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या मोठी असते. गेल्या काही वर्षापासून आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुणे विभागातील १४ आगारातून पंढरपूरसाठी एसटी गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ६ जुलै रोजी आषाढी यात्रा असल्यामुळे काही दिवस अगोदर गाड्या सोडण्यात येते. त्यासाठी एसटीच्या पुणे विभागाने एकूण सातशे बस सोडण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये ३५० बस या पुणे विभागाच्या आहेत. तर, इतर ३५० बस या मुंबई प्रदेश आणि विदर्भातून मागविण्यात आले आहे. त्यामुळे यंदा पंढरपुरला एसटी महामंडळाच्या बसने जाणाऱ्या वारकऱ्यांना एसटी बसची कमतरता भासणार नाही. गेल्या तीन-चार वर्षातील गाड्यांच्या तुलनेत यंदा एसटीकडून जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. पुणे जिल्ह्यातील सर्व १४ आगारासह स्वारगेट, शिवाजीनगर येथून धावणाऱ्या बसची संख्या जास्त असणार आहे.

ग्रुपने बुक करा, एसटी गावात येईल 

 वारकऱ्यांसाठी परिवहन महामंडळाने ग्रुप बुकिंगची सुविधा देण्यात आली आहे. एकाच गावातील ४० जणांच्या समूहाने ग्रुप बुकिंग केल्यास त्यांच्या गावातून गाडी सोडण्यात येणार आहे. या लोकांना घेण्यासाठी एसटी गावात जाईल. शिवाय दर्शन झाल्यावर पंढरपूर तेथून पुन्हा त्यांच्या गावी सोडेल. यामुळे प्रवाशांना थेट घरापासून पंढरपूरला जाण्याची सुविधा एसटीने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.

वारीसाठी असे आहे नियोजन 

- पुणे विभागातील धावणाऱ्या बस - ३५०- बाहेरील विभागातून मागविलेल्या बस - ३५०- एकूण पंढरपूला सोडण्यात येणारे बस - ७००- गेल्या वर्षी आषाढीला सोडलेल्या बस - ५५८

आषाढीला भाविकांची वाढती संख्या पाहता यंदा बसची संख्या वाढविण्यात आली आहे. पुणे विभागातून ७०० बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे भाविकांची सोय होणार आहे.- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी पुणे विभाग

टॅग्स :Puneपुणेashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022AlandiआळंदीdehuदेहूPandharpurपंढरपूरpassengerप्रवासी