शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Pune MP: पुण्याचे ७ खासदार केंद्रात; पक्षीय मतभेद विसरून जोर लावला तर ‘पाॅवर’ वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 11:31 IST

पुणे जिल्ह्यात प्रथमच आलेल्या या राजकीय पॉवरचा सुयोग्य वापर या सर्वांनी करावा, अशीच जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाची अपेक्षा

राजू इनामदार

पुणे : लोकसभा निवडणूक निकालानंतर (Lok Sabha Election 2024) जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलत असून, आता राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) सुनेत्रा पवार (Sunetra pawar) यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकाच वेळी ७ खासदार असणार आहेत. त्यातले १ केंद्रीय राज्यमंत्री आहेत. या राजकीय शक्तीचा उपयोग जिल्ह्याच्या विकासासाठी होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

एकाच वेळी ७ खासदार अशी स्थिती जिल्ह्यात प्रथमच झाली आहे. यातील पुणे शहर लोकसभेतून विजयी झालेले मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) हे केंद्रीय राज्यमंत्री झाले आहेत. जिल्ह्याचा प्राण असलेले सहकार व पुणे शहर तसेच जिल्ह्यासाठीही महत्त्वाचे ठरू शकणारे नागरी हवाई उड्डयन खाते त्यांना मिळाले आहेत. अन्य ६ खासदारांमध्ये शरद पवार (Sharad Pawar)  हे राज्यसभेचे खासदार ज्येष्ठ नेते असून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष आहेत. केंद्रीय राजकारणात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे.

जिल्ह्यातून निवडून आलेल्या खासदारांमध्ये प्रथमच खासदार झालेले मुरलीधर माेहाेळ आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) (चौथी टर्म), श्रीरंग बारणे (Shrirang Barne) (तिसरी टर्म), डॉ. अमोल कोल्हे (Amol kolhe) (दुसरी टर्म) यांचा समावेश आहे. यापैकी सुळे, बारणे, काेल्हे या तिघांनाही लोकसभेचा दांडगा अनुभव आहे. सुळे व कोल्हे एकाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आहेत; तर बारणे राज्यात मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे आहेत. पक्ष वेगवेगळे असले तरी ७ जण जिल्ह्याच्या प्रश्नांवर एकत्रित राहून बरेच काही करू शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

राज्यसभेवर निवडून आलेल्या प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) या पुण्याच्या कोथरूडमधील आहेत. त्या आमदार होत्या. भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सामाजिक प्रश्नांवर पक्ष निरपेक्ष विचार करणाऱ्या, प्रसंगी स्वपक्षातील काही जणांना थेट विरोध करणाऱ्या, अशी त्यांची प्रतिमा आहे. निवडणूक निकालातही काही गंमती आहेत.

एकाच घरातील तीन खासदार?

राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) राज्यसभेला उमेदवारी दिलेल्या सुनेत्रा पवार यात निवडून आल्यास एकाच तालुक्यातील, एकाच घरातील शरद पवार, सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार असे ३ खासदार असतील. सुनेत्रा लोकसभेच्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातूनच सुप्रिया सुळे यांच्याकडून सव्वालाख मतांच्या फरकाने पराभूत झाल्या आहेत. आता राज्यसभेच्या खासदार झाल्यावर त्या थेट शरद पवार यांच्याबरोबरीने सभागृहात असतील.

पॉवरचा हाेणार का सुयोग्य वापर?

एकूण ७ खासदारांमधील दाेघे पुणे शहरातील आहेत. यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व डॉ. मेधा कुलकर्णी यांचा समावेश आहे. प्रश्नांशी निगडित मंत्रालयाच्या केंद्रीय मंत्र्यांकडे एकाच वेळी या सातही जणांनी पक्षीय मतभेद विसरून जोर लावला तर कोणताही मंत्री यांना टाळू शकणार नाहीत. जिल्ह्यात प्रथमच आलेल्या या राजकीय पॉवरचा सुयोग्य वापर या सर्वांनी करावा, अशीच जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाची अपेक्षा आहे.

केंद्राशी निगडित या प्रश्नांवर उठवणार का आवाज?

- मेट्रोचा विस्तार : स्वारगेट -खडकवासला, स्वारगेट- हडपसर, स्वारगेट- कात्रज, वनाज-चांदणी चौक, कल्याणीनगर-विमानतळ, पिंपरी-निगडी, रामवाडी-वाघोली.- आंतरराष्ट्रीय नागरी विमानतळ : जागेविषयीच्या अडचणी दूर करून विषय मार्गी लावणे.- एमआयडीसी : जिल्ह्यात आयटी तसेच अन्य उद्योग आणणे, ज्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील.- सार्वजनिक वाहतूक- केंद्र सरकारच्या शहर विकास योजनेतून लहान प्रवासी वाहने मिळवणे.- रस्ते : रिंग रोड सारखे रेंगाळलेले प्रकल्प मार्गी लावणे.- नदी सुधार : समान पाणी योजना सारखे पुण्यासाठीचे प्रकल्प मार्गी लावणे.

टॅग्स :Puneपुणेmurlidhar moholमुरलीधर मोहोळSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेmedha kulkarniमेधा कुलकर्णीSunetra Pawarसुनेत्रा पवारshrirang barneश्रीरंग बारणेCentral Governmentकेंद्र सरकार