चार दिवसांत 7 कोटींचे प्रस्ताव
By Admin | Updated: June 29, 2014 22:56 IST2014-06-29T22:56:59+5:302014-06-29T22:56:59+5:30
सभागृह नेते सुभाष जगताप यांनी महापालिकेच्या मागील आठवडय़ात झालेल्या मुख्य सभेत दिली होती.

चार दिवसांत 7 कोटींचे प्रस्ताव
>पुणो : नगरसेवकांनी सुचविलेली वर्गीकरणो पुढील स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्याचे आश्वासन स्थायी समिती अध्यक्षांनी आपल्याला दिले असल्याची माहिती सभागृह नेते सुभाष जगताप यांनी महापालिकेच्या मागील आठवडय़ात झालेल्या मुख्य सभेत दिली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर अवघ्या चार दिवसांत स्थायी समितीसमोर तब्बल 6 कोटी 81 लाख रुपयांच्या वर्गीकरणाचे प्रस्ताव नगरसेवकांनी ठेवले होते.
याशिवाय मागील बैठकीत ठेवण्यात आलेले सुमारे 2 कोटी 6क् लाखांचे प्रस्तावही समितीच्या येत्या मंगळवारी होणा:या बैठकीत मान्यतेसाठी येणार आहे. त्यामुळे या सुमारे 1क् कोटींच्या वर्गीकरणाबाबत समिती काय निर्णय घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
या वेळी वर्गीकरणाबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी सभागृह नेते जगताप यांनी आपली समिती अध्यक्षांशी चर्चा झाली असून, पुढील बैठकीपासून सर्व वर्गीकरणो मान्य करण्यात येणार असल्याचे मुख्य सभेत सांगितले होते. त्यानंतर पुढील 4 दिवसांत तब्बल 6 कोटी 81 लाख रुपयांच्या वर्गीकरणाचे प्रस्ताव समितीसमोर मान्यतेसाठी दाखल झाले आहे. एकाच वेळी एवढे प्रस्ताव दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मागील बैठकांमधील सुमारे अडीच कोटींचे प्रस्तावही मान्यतेसाठी लटकलेले आहेत. (प्रतिनिधी)
4महापालिकेच्या 2क्13-14 च्या अंदाजपत्रकात पालिकेस सुमारे 125क् कोटी रूपयांची तूट आली आहे. तर पालिकेच्या तिजोरीत सुमारे 29क्क् कोटी रुपये जमा झाले असून, खर्च मात्र 31क्क् कोटी रुपयांचा झाला आहे. त्यामुळे नवीन अंदाजपत्रकात विकासकामांना कात्री लागणार आहे.
4ही बाब लक्षात घेऊन अनेक नगरसेवकांनी अंदाजपत्रकातील प्रस्तावित कामे न करता, आपल्या प्रभागातील इतर कामांसाठी वर्गीकरणाचे प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवले होते. मात्र, स्वत: समिती अध्यक्षांनीच त्यास आक्षेप घेत हे प्रस्ताव पुढे ढकलेले होते. त्याचे तीव्र पडसाद मुख्य सभेत उमटले होते. त्यानंतर सभागृहनेते सुभाष जगताप यांनी स्थायी समिती अध्यक्ष आपलेही ऐकत नसल्याची कबुली दिली होती. या प्रकारानंतर मागील आठवडय़ात सोमवारी पालिकेची जून महिन्याची मुख्य सभा झाली़