शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूचे ७ रुग्ण आढळले

By admin | Updated: February 26, 2015 03:18 IST

उन्हाळ्याची चाहूल लागली असून, उकाडा वाढूनही स्वाइन फ्लूचे रुग्ण शहरात आढळत आहेत. आज बुधवारी दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात अनुक्रमे

पिंपरी : उन्हाळ्याची चाहूल लागली असून, उकाडा वाढूनही स्वाइन फ्लूचे रुग्ण शहरात आढळत आहेत. आज बुधवारी दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात अनुक्रमे ४ व ३ असे एकूण ७ स्वाइन फ्लूबाधित रुग्ण आढळले. या आजाराची लक्षणे असलेली १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात ५ हजार १०८ जणांची तपासणी करण्यात आली.या आजारामुळे शहरात आतापर्यंत स्वाइन फ्लूमुळे ७ जणांचे प्राण गेले आहेत. सोमवारी (दि. २३) कामगारनगर, पिंपरी येथील एका महिलेचा पुण्यातील रुग्णालयात मृत्यू झाला. स्वाइन फ्लूची लक्षणे असलेल्या १५ रुग्णांसह स्वाइन फ्लूचे ७ रुग्ण बुधवारी वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल झाले.स्वाइन फ्लू रुग्णांची एकूण ३७ संख्या झाली आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ५ हजार १०८ जणांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी करण्यात आली. १ जानेवारी ते २५ फेबु्रवारी या कालावधीत बुधवारपर्यंत १ लाख ७८ हजार ८३४ जणांची तपासणी झाली. त्यांपैकी १९ हजार ६६५ जणांनी सर्दी, खोकला, ताप संबंधी आजारावर उपचार घेतले. बुधवारी त्यातील १ हजार २०१ जणांनी उपचार घेतले. एकूण ३१९ जणांना बुधवारी टॅमिफ्लू औषध देण्यात आले. ही संख्या एकूण २ हजार ८५१ वर पोहचली आहे. एकूण २२ जणांचे थुंकीचे नमुने तपासणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्यांतील ७ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे उघड झाले. आतापर्यंत एकूण २०८ जणांच्या थुंकीचे नमुने घेतले गेले आहेत.थेरगावच्या आदित्य बिर्ला रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या सर्वाधिक ११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय ९ आणि इतर ७ खासगी रुग्णालयांत स्वाइन फ्लूचे १७ रुग्ण उपचार घेत आहेत.(प्रतिनिधी)