शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरातील ७ पुल पाण्याखाली; रस्तेही झाले जलमय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 21:50 IST

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही धुवाधार पाऊस सुरु असल्याने धरणांमधून हजारो क्युसेक्सने पाणी नद्यांमध्ये सोडण्यात येत आहे. यामुळे मुळा-मुठा नद्यांना प्रचंड पूर आला आहे.  

ठळक मुद्देमुळा-मुठा नद्यांच्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत पुणे शहरातील ७ पुल पाण्याखाली; रस्तेही झाले जलमय

पुणे : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही धुवाधार पाऊस सुरु असल्याने धरणांमधून हजारो क्युसेक्सने पाणी नद्यांमध्ये सोडण्यात येत आहे. यामुळे मुळा-मुठा नद्यांना प्रचंड पूर आला आहे.  यामुळे पुणे शहरातील सात पुल पाण्याखाली गेले असून, अनेक रस्ते जलमय झाले आहेत. यामुळे अनेक भागात नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. यामध्ये पाण्याचा प्रवाह काहीसा कमी झाल्याने महादजी शिंदे पुल (डिमार्ट औंध ते सांगवी मार्गावरील) वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहिती वाहतुक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली.

शहर आणि परिसरामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. रविवार (दि.४) रोजी मुळा-मुठा नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विर्सग सोडण्यात आला. यामध्ये मुळशी आणि पवना धरणांमधून देखील मोठ्या प्रमाणात विर्सग सोडण्या आल्याने मुठा नदीच्या पाण्याचा पातळीत प्रचंड वाढ झाली. यामुळे औंध, सांगवी, येरवडा, दापोडी, वडगावशेरी, विश्रांतवाडी यादी भागात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. मुळा नदीला आलेल्या प्रचंड पूरामुळे सोमवारी (दि.५) रोजी सकाळी महादजी शिंदे पुल (डीमार्ट औंध ते सांगवी मार्गावरील), राजीव गांधीपुल (औंधगाव ते डांगेचौक मार्गवरील), जुना सांगवी पुल (स्पायसर कॉलेज ते जुनी सांगवी, नवी सांगवी मार्गावरील), दापोडी पुल (भाऊ पाटील रोड ते दापोडीगाव मार्गावरील), जुना होळकर पुल (खडकीबाजार ते साप्रस मार्गावरील ) हे पाच पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. तर मुठा नदीला आलेल्या पूरामुळे डेक्कन येथील भिडे पुल आणि महापालिका भवन समोरील टिळकपुल देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. या पुलाबरोबरच औंध, सांगवी, वडगावशेरी, येरवडा नदी पात्र, शांतीनगर, विश्रांतवाडी, सिंहगडरोड, पुण्यातील नदी पात्र रस्ता येथील रस्ते जलमय झाले. त्यात शहरामध्ये दिवसभर सततधार पाऊस सुरु असल्याने बहुतेक रस्ते जलमय झाले. यामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले. सुट्ट्यामुळे वाहतुक सुरळीतसोमवार, मंगळवार शहर आणि जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सर्व शाळा,महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. तसेच अनेक खाजगी कंपन्या, अस्थापनांनी देखील सुट्टी जाहीर केल्या. तर जिल्ह्याधिका-यांचे आवाहनला प्रतिसाद देत कामाशिवाय घराबाहेर पडण्याचे नागरिकांनी काही प्रमाणात टाळले. यामुळे सोमवार असून, देखील शहराची वाहतुक सुरळीत होती.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूरdeccan gymkhanaडेक्कन जिमखानाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका