करसंकलनापोटी पालिकेकडे ६५० कोटी
By Admin | Updated: September 1, 2015 04:16 IST2015-09-01T04:16:36+5:302015-09-01T04:16:36+5:30
महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे मिळकतकरापोटी आॅगस्टअखेरीस ६५० कोटी रुपये जमा झाले आहेत. मागील वर्षांपेक्षा १०६ कोटी रुपयांनी कर संकलन विभाग आघाडीवर आहे.

करसंकलनापोटी पालिकेकडे ६५० कोटी
पुणे : महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे मिळकतकरापोटी आॅगस्टअखेरीस ६५० कोटी रुपये जमा झाले आहेत. मागील वर्षांपेक्षा १०६ कोटी रुपयांनी कर संकलन विभाग आघाडीवर आहे.
कर संकलन विभागाचे उपआयुक्त सुहास मापारी यांनी ही माहिती दिली. महापालिका हद्दीमध्ये मालमत्ता करपात्र अशा एकूण ८ लाख ८ हजार मालमत्ता आहेत. यात दरवर्षी वाढ होत असते. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाला की करसंकलन विभागात त्याची नोंद होऊन संबंधित मालमत्ताधारकाला करआकारणी केली जाते. मागील आर्थिक वर्षात महापालिकेत मालमत्ताकरापोटी ८०० कोटी रुपये जमा झाले होते. या आर्थिक वर्षासाठी उद्दिष्ट वाढवून देण्यात आले असून, एकूण मागणी १२०० कोटी रुपयांची आहे. त्यापैकी आॅगस्टअखेरीस ६०० कोटी रुपये जमा झाले आहेत. कर आकारणी विभागाकडून जाहीर केल्या जात असलेल्या सवलतींमुळे मालमत्ताधारकांकडून कर जमा करण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांत कर जमा केला तर त्यात १० टक्के सवलत देण्यात येते. तब्बल ४ लाख मालमत्ताधारकांनी या योजनेला प्रतिसाद दिला असल्याचे मापारी यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)