धक्कादायक! पुण्यात 60 वर्षांच्या व्यक्तीचा दोन चिमुरडींवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 13:00 IST2019-03-20T12:55:58+5:302019-03-20T13:00:03+5:30

फरार आरोपीचा शोध सुरू

60 year old man sexual harasses two minor girls in pune | धक्कादायक! पुण्यात 60 वर्षांच्या व्यक्तीचा दोन चिमुरडींवर अत्याचार

धक्कादायक! पुण्यात 60 वर्षांच्या व्यक्तीचा दोन चिमुरडींवर अत्याचार

पुणे : कोथरुडमधील सुतारदरा येथे साडेचार व साडेतीन वर्षाच्या मुलींवर शेजारी राहणाऱ्या एका ६० वर्षाच्या ज्येष्ठाने अत्याचार केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री उघडकीस आला. कोथरुड पोलिसांनी पॉक्सोखाली त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

कोथरुडमधील सुतारदरा परिसरात वास्तव्यास असणाऱ्या एका कुटुंबातील आई-वडील दोन मुलींना घरात ठेवून काही कामासाठी बाहेर गेले होते. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या 60 वर्षांच्या व्यक्तीनं या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार त्या मुलींच्या आत्येच्या ५ वर्षीय मुलाने पाहिला. संध्याकाळी मुलींची आई घरी आल्यावर या मुलाने शेजाऱ्याने केलेल्या प्रकाराची माहिती त्यांना दिली. 

पीडित मुलींच्या आईनं या प्रकरणी शेजाऱ्याला जाब विचारल्यावर तो गडबडून गेला. मुलींच्या आईनं पोलिसांकडे तक्रार करतो, असं म्हटल्यावर आरोपीनं पळ काढला. पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी तक्रार केल्यानंतर कोथरुड पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. सध्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिली.
 

Web Title: 60 year old man sexual harasses two minor girls in pune