६0 बोटी जाळल्या!

By Admin | Updated: January 7, 2015 22:54 IST2015-01-07T22:54:02+5:302015-01-07T22:54:02+5:30

महिनाभरापासून दौैंड तालुक्यात वाळू माफियांविरोधात महसूल विभागाची कारवाई सुरूच असून, आतापर्यंत सुमारे ६0 बोटी पथकाने जाळल्या व २0 लाखांची दंडवसुली केली आहे.

60 boats burned! | ६0 बोटी जाळल्या!

६0 बोटी जाळल्या!

महिनाभरापासून दौैंड तालुक्यात वाळू माफियांविरोधात महसूल विभागाची कारवाई सुरूच असून, आतापर्यंत सुमारे ६0 बोटी पथकाने जाळल्या व २0 लाखांची दंडवसुली केली आहे.
तरीही उपसा सुरू असल्याने चित्र आहे. भीमापात्र
वाळू माफियांनी पुरते पोखरले आसून, हैदोस घातला आहे.

राजेगाव-खानोट्यात
७ बोटीवंर कारवाई
राजेगाव : खानोटा (दौंड) येथील भीमा नदीच्यापात्रात बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या ७ बोटी महसूलच्या पथकाने आज जिलेटिनने जाळल्या असल्याची माहिती तहसीलदार उत्तम दिघे यांनी दिली.
वाळूच्या अवजड वाहतुकीमुळे रस्तेही खराब होत चालले आहेत. तर, ग्रामस्थांना आणि ऊसतोडणी मजुरांना वाळू व्यावसायिकांकडून दमदाटी केली जाते. अशा आशयाच्या तक्रारी महसूल विभागाकडे आल्या होत्या. त्यानुसार महसूल विभागाने आजची कारवाई केली.
या कारवाईत तहसीलदार उत्तम दिघे, नायब तहसीलदार सुनील शेळके, मंडलाधिकारी शंकर स्वामी, मोहन कांबळे यांच्यासह गावकामगार तलाठी सहभागी झाले होते. गेल्या आठ दिवसांपासून या भागात वाळूमाफियांच्या बोटी जाळल्या जात आहेत.
नदीकाठी उभ्या असलेल्या बोटींचीदेखील विल्हेवाट लावली जात असल्याने काही वाळूमाफियांनी फायबर आणि यांत्रिकी बोटी नदीलगतच्या ओढ्यात आणि झाडाझुडपात लपवून ठेवल्या होत्या. तसेच या होड्यांवर काटेरी झुडपे तोडून टाकले होती. त्यामुळे होड्या दिसून येत नव्हत्या; मात्र महसूल खात्याने याचा शोध घेऊन या बोटींची विल्हेवाट लावली. या कारवाईमुळे वाळूमाफियांनी चांगलीच धास्ती घेतली असून, अशाच कारवाया कायम होत राहिल्या, तर भविष्यात बेकायदा वाळूचोरी बंद होण्यास आळा बसेल, असे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे.

बेकायदा वाळूउपशावर कारवाई केली जात आहे. भविष्यातही ही कारवाई थांबणार नाही. तसेच नदीकाठच्या शेतकऱ्यांनी वाळूमाफियांच्या दादागिरीला भीक घालू नये. यापुढे कोणीही वाळूमाफिया दादागिरी करीत असेल, तर त्याची रीतसर तक्रार महसूल खात्याकडे करावी आणि महसूल खाते त्याची तक्रार पोलिसांकडे करून ग्रामस्थांना न्याय देण्याचे काम करेल
- उत्तम दिघे ,
तहसीलदार, दौैंड तालुका

Web Title: 60 boats burned!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.