Pune: चिमुरडी जिवाच्या आकांताने ओरडत होती, प्रसंगावधान राखत ग्रील कापून आगीतून काढले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 02:36 PM2023-10-14T14:36:18+5:302023-10-14T14:42:48+5:30

अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून खोलीच्या खिडकीचे लोखंडी ग्रील्स कापून मोठ्या शिताफीने बालिकेची सुटका केली....

6-year-old girl rescued from fire, praise for firemen's efforts pune latest news | Pune: चिमुरडी जिवाच्या आकांताने ओरडत होती, प्रसंगावधान राखत ग्रील कापून आगीतून काढले बाहेर

Pune: चिमुरडी जिवाच्या आकांताने ओरडत होती, प्रसंगावधान राखत ग्रील कापून आगीतून काढले बाहेर

धनकवडी (पुणे) : भारती विद्यापीठासमोरील नँन्सी लेक होम या गगनचुंबी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर शुक्रवारी (दि.१३) रात्री लागलेल्या भीषण आगीत सदनिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर या दुर्घटनेत एक ६ वर्षाची बालिका बंद खोलीत अडकून पडली होती. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून खोलीच्या खिडकीचे लोखंडी ग्रील्स कापून मोठ्या शिताफीने बालिकेची सुटका केली.

नॅन्सी लेक होम या इमारतीत आग लागल्याची वर्दी अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळाली. क्षणाचा ही विलंब न करता कात्रज अग्निशमन दलाबरोबरच गंगाधाम, कोंढवा बुद्रुक येथून एकूण ४ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली.

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचताच तेथे ११ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर १५६० स्क्वे.फुट सदनिकेत मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे दिसून आले. जवानांनी तडकाफडकी चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला आणि त्याचवेळी घरामधे कोणी अडकले आहे का, याची तपासणी करत असताना ६ वर्षांची बालिका  (कु. राजलक्ष्मी दिलिप सुकरे, - वय वर्ष ९) खिडकी मधील लोखंडी ग्रिलमधे अडकल्याचे आणि आपल्याला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत असल्याचे दिसून आले. 

अग्निशमनच्या जवानांनी तातडीने मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दोन बी.ए.सेट तसेच हायड्राॅलिक कटर, कटावणी, रस्सीचा वापर करत उंच खिडकीजवळ शिडी लावून मुलीला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याचवेळी काही जवानांनी शेजारील सदनिकेच्या गच्चीवरुन मुली च्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. अवघ्या पाच ते दहा मिनिटात जवानांच्या प्रयत्नांना यश आले आणि आगीमधे अडकलेल्या मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली. 

त्याचबरोबर फ्लॅटला लागलेल्या आगीवर जवानां नी केवळ वीस मिनिटात नियंञण मिळवले. फ्लॅटचे मोठे नुकसान झाले असून आग इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे आगीमध्ये कोणी जखमी झाले नाही वा जिवातहानी  झाली नाही. 

अग्निशमनने बजावलेल्या यशस्वी कार्यवाहीमध्ये अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदिप खेडेकर, यांच्या बरोबर कर्तव्यावर हजर नसताना घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी हजर असलेले तांडेल सचिन शिंदे, वाहन चालक येरफुले, अतुल मोहीते, तांडेल मंगेश मिळवणे व जवान रामदास शिंदे, तेजस मांडवकर, चंद्रकांत गावडे, सुधीर नवले, लक्ष्मण घवाळी, दिगंबर बांदिवडेकर, तेजस खरीवले, अर्जुन यादव आणि अभिजित थळकर आदी जवानांचा सहभाग होता.

Web Title: 6-year-old girl rescued from fire, praise for firemen's efforts pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.