6 thousand 434 corona victims in Pune city on Sunday, while 4 thousand 712 corona free | Pune Corona News: पुणे शहरात रविवारी ६ हजार ४३४ कोरोनाबाधितांची वाढ, तर ४ हजार ७१२ कोरोनामुक्त

Pune Corona News: पुणे शहरात रविवारी ६ हजार ४३४ कोरोनाबाधितांची वाढ, तर ४ हजार ७१२ कोरोनामुक्त

ठळक मुद्देआतापर्यंत ३ लाख ४ हजार ४९२ कोरोनामुक्त

पुणे : शहरात रविवारी ६ हजार ४३४ कोरोनाबाधित आढळून आले असून, ४ हजार ७१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़. आज दिवसभरात २४ हजार ७२ जणांनी कोरोना तपासणी केली असून तपासणीच्या तुलनेत आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची टक्केवारी ही २६.७२ टक्के इतकी आहे. 

दरम्यान आज दिवसभरात ७३ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २० जण  पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.६६ टक्के इतका आहे. 

पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ५ हजार ८७० कोरोनाबाधित रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार २५० रूग्ण हे गंभीर आहेत़. शहरात आत्तापर्यंत १८ लाख ८० हजार ७३५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ३ लाख ६७ हजार २३७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़. तर यापैकी ३ लाख ४ हजार ४९२ कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही सद्यस्थितीला ५६ हजार ६३६ इतकी आहे़ 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 6 thousand 434 corona victims in Pune city on Sunday, while 4 thousand 712 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.